Fardeen Khan | ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची मुलगी आहे फरदीन खानची पत्नी; 18 वर्षांनंतर होणार विभक्त

| Updated on: Jul 31, 2023 | 9:18 AM

फरदीन आणि नताशाने डिसेंबर 2005 मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नताशाने 2013 मध्ये मुलीला जन्म दिला. तर 2017 मध्ये तिने मुलाला जन्म दिला. डायनी इसाबेला खान असं त्यांच्या मुलीचं नाव असून अझेरियस फरदीन खान असं मुलाचं नाव आहे.

1 / 5
बॉलिवूडमधील आणखी एक जोडी विभक्त होणार असल्याचं वृत्त आहे. अभिनेता फरदीन खान आणि त्याची पत्नी नताशा माधवानी हे घटस्फोट घेत आहेत. गेल्या वर्षभरापासून हे दोघं वेगवेगळे राहत आहेत.

2 / 5
वैवाहिक आयुष्यातील समस्यांचं निवारण होत नसल्याने दोघं गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत आहेत. अखेर एकमेकांच्या संमतीने त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या 18 वर्षांनंतर ही जोडी विभक्त होणार आहे. यावर फरदीनने अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

3 / 5
नताशा ही 70 च्या दशकातील बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मुमताजची मुलगी आहे. तिच्या वडिलांचं नाव मयुर माधवानी असं आहे. फरदीन सध्या त्याच्या आईसोबत मुंबईत राहतोय, तर नताशा लंडनमध्ये राहतेय.

4 / 5
फरदीन आणि नताशाने डिसेंबर 2005 मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नताशाने 2013 मध्ये मुलीला जन्म दिला. तर 2017 मध्ये तिने मुलाला जन्म दिला. डायनी इसाबेला खान असं त्यांच्या मुलीचं नाव असून अझेरियस फरदीन खान असं मुलाचं नाव आहे.

फरदीन आणि नताशाने डिसेंबर 2005 मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. नताशाने 2013 मध्ये मुलीला जन्म दिला. तर 2017 मध्ये तिने मुलाला जन्म दिला. डायनी इसाबेला खान असं त्यांच्या मुलीचं नाव असून अझेरियस फरदीन खान असं मुलाचं नाव आहे.

5 / 5
फरदीनने 'प्रेम अगन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. चॉकलेट बॉय म्हणून त्याची ओळख झाली होती. फरदीनने फ्लाइटमध्ये नताशाला प्रपोज केलं होतं. लग्नाच्या आधी दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं होतं.