Don 3 | ‘डॉन 3’च्या वादावर फरहान अख्तरने सोडले माैन, शाहरुख खान आणि रणवीर सिंह यांच्याबद्दल केले मोठे भाष्य

| Updated on: Aug 16, 2023 | 4:26 PM

फरहान अख्तर याचा डाॅन 3 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. नुकताच आता फरहान अख्तर याने एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये फरहान अख्तर हा डाॅन 3 बद्दल मोठे भाष्य करताना दिसला आहे.

Don 3 | डॉन 3च्या वादावर फरहान अख्तरने सोडले माैन, शाहरुख खान आणि रणवीर सिंह यांच्याबद्दल केले मोठे भाष्य
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून डॉन 3 (Don 3) हा चित्रपट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. डॉन 3 हा चित्रपट तूफान चर्चेत आहे. डॉन 3 चित्रपटाचे निर्माता फरहान अख्तर याच्यावरही नेटकरी भडकल्याचे बघायला मिळाले. फरहान अख्तर (Farhan Akhtar) याने डॉन 3 चित्रपटाची घोषणा केली. विशेष म्हणजे चाहते देखील या चित्रपटाची वाट पाहताना दिसले. डॉन 3 चित्रपटात शाहरुख खान हा दिसणार नसल्याचे स्पष्ट होताच चाहत्यांमध्ये नाराजी बघायला मिळाली. इतकेच नाही तर अनेकांनी थेट डॉन 3 मध्ये शाहरुख खान नाही तर चित्रपट बघायचा नाही असेही म्हणून टाकले.

डॉन 3 चित्रपटामध्ये शाहरुख खान ऐवजी रणवीर सिंह हा दिसणार आहे. मात्र, चित्रपट निर्मात्यांचा निर्णय बऱ्याच लोकांना अजिबातच आवडला नसल्याचे बघायला मिळाले. काही लोकांनी तर थेट रणवीर सिंह याच्यावरही टिका करण्यास सुरूवात केली. यानंतर रणवीर सिंह याने एक भावनिक पोस्टच थेट सोशल मीडियावर शेअर केली.

आता नुकताच फरहान अख्तर याने डॉन 3 चित्रपटाच्या वादावर मोठे भाष्य केले आहे. फरहान अख्तर याने एक मुलाखत दिलीये, या मुलाखतीमध्ये फरहान अख्तर मोठे खुलासे करताना देखील दिसला. फरहान अख्तर म्हणाला की, ज्यावेळी रणवीर सिंह याला डॉन 3 चित्रपटाची आॅफर दिली, त्यावेळी तो देखील घाबरला होता.

कारण शाहरुख खान ऐवजी तो आता डाॅनच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. अगोदर आमिताभ बच्चन यानंतर शाहरुख खान आणि आता रणवीर सिंह दिसणार आहे. मुळात म्हणजे रणवीर सिंह याच्याकडे अभिनयाची ती ताकद आहे आणि तो नक्कीच हे सर्व काही व्यवस्थितपणे करेल. डॉन 3 हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे.

पुढे फरहान अख्तर म्हणाला, “मी हे पुढे घेऊन जाण्यासाठी खूप जास्त उत्सुक आहे. रणवीर सिंह जबरदस्त आहे. या पार्टसाठी रणवीर सिंह परफेक्ट आहे. शाहरुख हा चित्रपट करत असतानाही आम्ही एका वेगळ्या भावनेतून गेलो होता, कारण त्याअगोदर अमिताभ बच्चन हे डाॅनच्या भूमिकेत होते. त्यावेळीही लोकांना वाटले होते की, शाहरुख खान हा अमिताभ बच्चन यांची जागा घेतोय. आता वाटत आहे की, रणवीर सिंह शाहरुख खानची जागा घेतोय.