बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. नुकताच ऐश्वर्या राय हिने मतदानाचा आपला हक्का बजावला आहे. ऐश्वर्या राय हिच्या हाताला मोठी दुखापत झालीये. ऐश्वर्या राय हिच्या हाताला कशामुळे दुखापत झाली, हा प्रश्न सातत्याने चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. ऐश्वर्या राय ही तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचे सातत्याने सांगितले जातंय.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भाष्य करणे टाळले आहे. फक्त ऐश्वर्या राय आणि अभिषेकच नाही तर बच्चन कुटुबियांपैकी देखील कोणीच यावर भाष्य केले नाहीये. मध्यंतरी तर अनेक रिपोर्टमध्ये थेट सांगण्यात आले की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न 2007 मध्ये झाले. विशेष म्हणजे अत्यंत शाही पद्धतीने यांचा विवाहसोहळा पार पडला. ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांचे लग्न त्यावेळी सर्वाधिक चर्चेत देखील राहिले. अशी एक चर्चा होती की, ऐश्वर्या राय हिने लग्नात घातलेली कांजीवरम साडी अत्यंत महागडी होती. या साडीसाठी मोठे पैसे मोजले होते.
ऐश्वर्या राय हिने लग्नात घातलेली साडी सोन्याच्या धाग्यांनी तयार करण्यात आल्याचेही सांगितले गेले. आता त्याबद्दलच मोठा खुलासा करण्यात आलाय. इंडियन सेलिब्रिटी फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनीच ऐश्वर्या राय हिच्या लग्नाची साडी तयार केली होती. आता ऐश्वर्या रायच्या लग्नातील साडीबद्दल नीता लुल्ला यांनी अत्यंत मोठा खुलासा केलाय.
नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये नीता लुल्ला म्हणाल्या की, ऐश्वर्या रायच्या लग्नातील साडी जितकी काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आली तितकी नक्कीच महागडी नाहीये. ती नेहमीसारखीच कांजीवरम साडी होती. हेच नाही तर साडीवर रेगुलर ब्लाऊज कॅरी करण्यात आले. त्यावर फक्त जरीचे काम केले गेले. यावर नीता लुल्ला यांना विचारण्यात आले की, ऐश्वर्याच्या साडीची नेमकी किंमत किती होती. यावर नीता लुल्ला यांनी बोलणे टाळले.