झगमगत्या विश्वातील अनेत गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. पण झगमगत्या विश्वातील काही रहस्य असे देखील आहेत, जे समोर आल्यानंतर फक्त सेलिब्रिटींचे कुटुंबिय नाही तर, चाहत्यांच्या डोळ्यात देखील पाणी आलं. असंच काही झाली आहे, एका लोकप्रिय बाप – लेकासोबत… 70 आणि 80 च्या दशकातील सिनेमांच्या माध्यमातून एक खलनायक चाहत्यांच्या भेटीस आला. प्रचंड हँडसम असून देखील अभिनेत्याला खलनायकाच्या भूमिकेत समाधान मानावं लागलं. असंच काही अभिनेत्याच्या मुलासोबत देखील झालं. 90 च्या दशकात अभिनेत्याचा मुलगा देखील खलनायक म्हणून चाहत्यांच्या भेटीस आला.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, ज्याप्रकारे अभिनेत्याचं निधन वयाच्या 45 व्या वर्षी झालं, त्याचप्रकारे अभिनेत्याच्या मुलाने देखील अखेरचा श्वास घेतला. सांगायचं झालं तर, अभिनेता आणि मुलाला एकाच गंभीर आजाराने ग्रासलं होतं. त्याच आजाराने बाप – लेकाचा अंत झाला. सध्या ज्या सेलिब्रिटी बाप – लेकाच्या आयुष्याची चर्चा रंगली आहे, ते दुसरे तिसरे कोणी नसून अभिनेते युसुफ खान आणि त्यांचा मुलगा फराझ खान आहेत.
घटना आहे 1985 सालची… युसुफ खान मोठ्या आनंदानं सिनेमाच्या शुटिंगसाठी पोहोचले होते. शुटिंगसाठी खान याचा शॉट रेडी होता आणि युसुफ तयार होत होते. युसुफ खान सिनेमाच्या सेटवर पोहोचणार तेवढ्या अभिनेते चालताना अडखळले आणि जमीनीवर पडले… मीडिया रिपोर्टनुसार, युसुफ यांना तात्काळ रुग्णालयात देखील दाखल करण्यात आलं होतं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
युसुफ खान यांच्या निधनानंतर कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. कारण वयाच्या 45 व्या वर्षी युसुफ यांनी अखेरचा श्वास घेतला. पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर त्यांच्या निधनाचं खरं कारण समोर आलं, ब्रेन हॅमरेजमुळे युसुफ खान यांचं निधन झालं. निधनानंतर युसुफ खान पत्नी आणि मुलांना सोडून कायमचे पुढच्या प्रवासासाठी गेले.
असंच काही युसुफ खान यांचा मुलगा फराझ खान याच्यासोबत देखील झालं. 2010 नंतर फराझ खान आजारी राहू लागले होते. ते घराबाहेर देखील निघत नव्हाते. 2019 मध्ये त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा फराझ खान यांच्या उपचारासाठी जवळपास 25 लाख रुपये लागले होते.
रिपोर्टनुसार, फराझ खान यांच्या प्रकृतीबद्दल जेव्हा सलमान खान याला कळलं तेव्हा भाईजानने पूर्ण बिल भरलं होतं. पण उपचारानंतर एक वर्ष देखील फराझ खान जिवंत राहीले नाहीत. त्यांनी 2020 मध्ये अखेरचा श्वास घेतला. नंतर असं समोर आले की फराझ यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता जो त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचला होता. वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी त्यांनी वडिलांप्रमाणेच नशिबाचा सामना केला. बाप – लेकाच्या निधनाने इंडस्ट्री मोठा धक्का बसला होता.