देवदेवतांच्या उत्तम कलाकृती बनवतो हा निर्माता; बिग बींपासून सुनील शेट्टीपर्यंत त्याच्या कलेचे चाहते

| Updated on: Nov 22, 2023 | 8:29 PM

कलाविश्वात एक चित्रपट निर्माता असाही आहे, जो केवळ चित्रपटांची निर्मितीच करत नाही, तर आपल्या कलेमुळेही स्वत:ची वेगळी निर्माण करतोय. यश जोशी असं या निर्मात्याचं नाव आहे. त्याने काढलेल्या देवदेवतांच्या चित्रांचे चाहते मोठमोठे बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत.

देवदेवतांच्या उत्तम कलाकृती बनवतो हा निर्माता; बिग बींपासून सुनील शेट्टीपर्यंत त्याच्या कलेचे चाहते
Suniel Shetty and Yash Joshi
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 22 नोव्हेंबर 2023 | बॉलिवूडमध्ये असे एक चित्रपट निर्माते आहेत, जे केवळ चित्रपट निर्मितीतच नाही तर इतर कलाकृतीतही निपुण आहेत. यश जोशी असं त्यांचं नाव असून त्यांच्या कलाकृतीचं कौतुक बॉलिवूड सेलिब्रिटींपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा कौतुक केलं आहे. सुनील शेट्टी, विंदू दारा सिंग, अमिताभ बच्चन आणि पुनीत इस्सार हे कलाकारदेखील त्यांच्या कलेचे चाहते आहेत. यश जोशी हे निर्मातासोबतच उत्तम कलाकारसुद्धा आहेत. कला आणि पेंटिंगशी संबंधित ते एका चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. यामध्ये बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार भूमिका साकारणार आहेत.

यश जोशी यांचा जन्म उदयपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री नाथद्वारा या प्रसिद्ध शहरात झाला. एका मध्यमवर्गीय राजस्थानी कुटुंबात जन्मलेल्या यश यांनी आज स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी 3D, 4D आणि 5D कलाकृतींमध्ये प्रभुत्त्व मिळवलं आहे. त्यांची कला केवळ राजस्थानमध्येच नाही तर महाराष्ट्रातही प्रसिद्ध आहे. यश जोशी यांच्या अनेक कलाकृती बॉलिवूड आणि औद्योगिक विश्वातील नामांकित लोकांच्या घरात आणि कार्यालयांमध्ये पहायला मिळतात.

हे सुद्धा वाचा

नुकतंच मुंबईतील गोरेगाव इथल्या नेस्कोमधील ‘द हार्ट ऑफ आर्ट’ प्रदर्शनात त्यांची कला सादर करण्यात आली होती. विंदू दारा सिंग, सुनील शेट्टी, पुनीत इस्सार आणि प्रसिद्ध आर्टिस्ट पृथ्वी यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं. यश हे चित्रपट निर्मातेसुद्धा असल्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत त्यांची चांगली ओळख आहे. त्यांची कंपनी तुलसी आर्टची स्थापना 2010 मध्ये नाथद्वारामध्ये झाली. यश यांच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगलाही लवकरच सुरुवात होणार आहे. लंडन आणि फ्रान्समध्ये त्याचं शूटिंग पार पडणार आहे.