‘घायल’चा निर्माता राजकुमार संतोषी बाराच्या भावात, कोर्टाकडून शिक्षा, कोटीच्या घरात दंड भरावा लागणार; काय आहे प्रकरण?

| Updated on: Feb 17, 2024 | 5:06 PM

Rajkumar Santoshi : चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. राजकुमार संतोषी यांना थेट मोठी शिक्षा ही कोर्टाकडून सुनावण्यात आलीये. राजकुमार संतोषी यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिले आहेत. राजकुमार संतोषी हे कायमच चर्चेत असतात.

घायलचा निर्माता राजकुमार संतोषी बाराच्या भावात, कोर्टाकडून शिक्षा, कोटीच्या घरात दंड भरावा लागणार; काय आहे प्रकरण?
Follow us on

मुंबई : चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिली आहेत. राजकुमार संतोषी हे मोठ्या वादात सापडल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर आता राजकुमार संतोषी यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे देखील बघायला मिळतंय. राजकुमार संतोषी यांना थेट आता दुप्पट दंड हा भरावा लागणार आहे. कोर्टाकडून थेट मोठी शिक्षा ही राजकुमार संतोषी यांना सुनावण्यात आलीये. राजकुमार संतोषी यांचे हे प्रकरण तसे जुने आहे. आता याबद्दलचा निकाल हा कोर्टाकडून देण्यात आलाय. राजकुमार संतोषी हे बाराच्या भावात गेल्याचे बघायला मिळतंय.

चेक बाऊंस प्रकरणात जामनगर कोर्टाकडून हा अत्यंत मोठा निर्णय देण्यात आलाय. राजकुमार संतोषी यांना थेट कोर्टाने दोन वर्षांची जेलची शिक्षा देखील सुनावली आहे. हेच नाही तर थेट दोन कोटी रूपये जमा करण्यासही सांगितले आहेत. कोर्टाकडून शनिवारी या प्रकरणातील सुनावणी ही करण्यात आलीये. राजकुमार संतोषी यांनी जामनगर मधील एका व्यावसायिकाकडून 1 कोटी रूपये उधार घेतले होते.

अशोकलाल असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे. या व्यावसायिकाचे पैसा राजकुमार संतोषी यांनी परत केले नाहीत. यानंतर अशोकलाल यांनी राजकुमार संतोषी यांच्या विरोधात थेट कोर्टात धाव घेतली. मुळात म्हणजे राजकुमार संतोषी आणि अशोकलाल हे खूप चांगले मित्र होते. 2015 मध्ये राजकुमार संतोषी यांनी अशोकलाल यांच्याकडून ही एक कोटीची रक्कम घेतली.

राजकुमार संतोषी यांनी अशोकलाल यांना 10 लाखांचे 10 चेक दिले होते. जे 2016 मध्ये बाऊंन्स झाले. यानंतर राजकुमार संतोषी यांच्यासोबत अशोकलाल यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अशोकलाल यांचा संपर्क राजकुमार संतोषीसोबत होऊ शकला नाही. या प्रकरणात कोर्टाकडून तब्बल 18 सुनावणी या घेण्यात आल्या. मात्र, एकही सुनावणीस राजकुमार संतोषी हजर झाले नाहीत.

सुरूवातीला राजकुमार संतोषी यांना कोर्टाने चेक बाऊंस झाल्याने 15 हजार देण्यास सांगितले होते. मात्र, आता कोर्टाने थेट मोठा निर्णय दिलाय. उधार घेतलेली दुप्पट रक्कम, दोन वर्षांची शिक्षा असा निर्णय आता कोर्टाकडून देण्यात आलाय. खरोखरच राजकुमार संतोषी यांना हा बसलेला जोरदार धक्काच म्हणावा लागणार आहे. आता राजकुमार संतोषी यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट दिसतंय.