वाँटेड गँगस्टर गोल्डी ब्रार हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर गोल्डी ब्रार चर्चेत आला. गोल्डी ब्रारनेच सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. हेच नाही तर हत्येसाठी शूटर आणि इतर सर्व प्लनिंग हे गोल्डी ब्रारचेच होते. याबद्दल स्वत: गोल्डी ब्रारने सांगितले होते. अमेरिकेत बसून गोल्डी ब्रार हा लॉरेन्स बिश्नोई गँग चालवतो. पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीमध्ये या गँगचे नेटवर्क आहे. गेल्या काही दिवसांपासून याच गँगकडून सलमान खान याला देखील जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत.
लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रमुख गोल्डी ब्रार आहे. रिपोर्टनुसार गोल्डी ब्रार हा आपल्या काही साथीदारांसोबत कॅलिफोर्निया येथे घराबाहेर उभा होता. 30 एप्रिल 5:25 ला गोल्डी ब्रारवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराच्या घटनेनंतर त्याला लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले. मात्र, याबद्दल अजून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाहीये.
याबद्दलच्या बातम्या अमेरिकेतील मीडियावर प्रसारित केल्या जात आहेत. गोल्डी ब्रारचे खरे नाव सतिंदर सिंह आहे. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर पोलिस हे गोल्डी ब्रारच्या शोधात आहेत. रिपोर्टनुसार गोल्डी ब्रार हा अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यात राहतो. केंद्र शासनाने गोल्डी ब्रारच्या नावाची घोषणा दहशतवादी म्हणून केलीये.
गोल्डी ब्रारने गुरलाल सिंह पहलवानची गोळी घालून हत्या केली, यानंतर तो कॅनडात गेला. चुलत भावाच्या हत्येचा बदला म्हणून त्याने गुरलाल सिंहची हत्या केल्याचे सांगितले जाते. तेंव्हापासून तो विदेशात राहून भारतात खंडणी व गँगवाॅर घटना घडवतो. फक्त गोल्डी ब्रारच नाही तर लॉरेन्स बिश्नोई गँगेच अजूनही बरेच सदस्य विदेशात बसून गँग चालवत आहेत. हेच नाही तर गोल्डी ब्रार हा थेट लॉरेन्स बिश्नोई याच्या संपर्कात असल्याचे देखील सांगितले जाते.
लॉरेन्स बिश्नोई याने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये थेट सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी लॉरेन्स बिश्नोई याने दिली होती. 14 एप्रिल 2024 रोजी सलमान खान याच्या घरावर पहाटे गोळीबार करण्यात आला. ज्यावेळी हा गोळीबार झाला, त्यावेळी सलमान खान हा घरातच होता. या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली. अनमोल बिश्नोई हा देखील सध्या अमेरिकेतच आहे.