Nitin Desai मृत्यू प्रकरणी पाच जणांवर FIR दाखल; पत्नीने केले गंभीर आरोप

| Updated on: Aug 05, 2023 | 7:32 AM

नितीन देसाई यांच्या निधनानंतर पोलीसांची मोठी कारवाई; पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर पाच जणांविरोधात पहिला गुन्हा दाखल... नितीन देसाई यांच्या निधनाला नवं वळण

Nitin Desai  मृत्यू प्रकरणी पाच जणांवर FIR दाखल; पत्नीने केले गंभीर आरोप
Follow us on

मुंबई | 5 ऑगस्ट 2023 : प्रसिद्ध कालादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. आर्थिक विवंचनेतून नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असं सांगण्यात येत आहे. बुधवारी स्वतः उभारलेल्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता नितीन देसाई मृ्त्यू प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे. नितीन देसाई यांच्या निधनानंतर पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. नितीन देसाई यांच्या पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर पाच जणांविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन देसाई प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या ११ ऑडिओ क्लिप पोलिसांना मिळाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे त्या लोकांची नावे आहेत जे नितीन देसाई यांना त्रास देत होते. पोलिसांनी हा ऑडिओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला होता. दरम्यान, नितीन देसाई यांच्या पत्नीने तक्रार दिली आहे.

कला दिग्दर्शकाची पत्नी नेहा यांनी तक्रारीत म्हटलं आहे की, पतीने मानसिक त्रासामुळे स्वतःला संपवलं. ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस कंपनीचे अधिकारी कर्जाबाबत पतीला वारंवार त्रास देत होते. असं देखील नितीन देसाई यांच्या पत्नी म्हणाल्या आहे.

“माझे पती यांच्यावरती असलेल्या मानसिक दडपणामुळे ते घरामध्ये कोणाशी काही न बोलणे गप्प गप्प राहत होते किंवा कधीही चिडचिडेपणा करीत होते. २०२३ च्या मार्च महिन्यामध्ये घरामध्ये फक्त आम्ही दोघेच असताना माझे पती माझ्यासमोर रडले आणि हे लोक माझ्या स्वप्नातील स्टुडिओ गिळंकृत करण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यामुळे मला जीवन जगणे असह्य झाले आहे, असं त्यांनी बोलून दाखवलं होतं”, असं नेहा आपल्या जबाबात म्हणाल्या.

नितीन देसाई यांनी काही वर्षांपूर्वी एडलव्हाईज कंपनीकडून तब्बल १८० कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्या कर्जाची पूर्ताता नितीन देसाई करु शकले नव्हते. १८० कोटींचं कर्ज जवळपास २५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. आर्थिक विवंचनेत अडकल्यामुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचललं असं सांगण्यात येत आहे. आता नितीन देसाई यांच्या मृत्यूप्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.