Firing during shoot : कला विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एका प्रसिद्ध रॅपरच्या गाण्याची शुटिंग सुरु असताना परिसरात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात अनेक जण जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना घडली आहे अमेरिकेत. अमेरिकेतील फ्लोरिडा याठिकाणी असलेल्या मियामा गार्डन जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये शुटिंग सुरु होती. हॉटेल बाहेर शुटिंग सुरू असताना अचानक परिसरात गोळीबार झाला.
प्रसिद्ध रॅपर फ्रेंच मोंटानाच्या गाण्याचा व्हिडीओ शूट होत असताना गोळीबार झाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस घटना स्थळी पोहोचले आणि त्यांनी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. झालेल्या धक्कादायक घटनेनंतर, पोलीस म्हणतात, ‘एका अज्ञात ठिकाणी घटना घडली…’
पोलीस पुढे म्हणाले, ‘अज्ञात ठिकाणी सुरु असलेला वाद शेवटी हॉटेलपर्यंत येवून पोहोचला. ज्याठिकाणी शुटिंग सुरु होती.’ अनेक जणांना गोळी लागल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. पण किती जणांना गोळी लागली याबद्दल काही कल्पना नसल्याचं देखील पोलीस म्हणाले. पण मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, या गोळीबारात जवळपास १० जणांना गोळी लागली आहे.
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉलेटच्या पार्किंगमध्ये गोळीबार होण्यास सुरुवात झाली. तेव्हा रॅपर फ्रेंच मोंटानाचं शूट सुरु होतं. या दरम्यान अनेक लोक शुटिंग सुरु असलेल्या ठिकाणी उपस्थित होते. तेव्हा १० ते १५ गोळ्याचा आवाज झाला आणि जमलेल्यांची पळापळ सुरु झाली.
गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अग्नीशमन दलाच्या गाड्यांसह घटनास्थळी पोहोचले. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अद्याप गोळीबार करणाऱ्या एकाही व्यक्तीला अटक करण्यात आलेली नाही. घटनेनंतर परिसरातील दुकाणं हॉटेल तात्काळ बंद करण्यात आले. सध्या याप्रकरणाची पोलीस तपास करत आहेत.