अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सांगायचं झालं तर अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांनी पोलिसांनी अटक केली आहे. 48 तासांच्या आत त्यांना गुजरात येथून अटक करण्यात आली. एवढंच नाही तर, दोन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
अहमदाबाद पोलिसांनी 24 वर्षीय विक्की साहेब गुप्ता आणि 21 वर्षीय सागर जोगेंद्र पाल यांना भुज येथून अटक केली आहे. दोघेही माता मंदिरात लपून बसल्याची माहिती स्थानिक गुप्तचरांकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी गुप्तपणे कारवाई करत रात्री एक वाजण्याच्या सुमारास दोघांना अटक करण्यात आली.
चौकशीमध्ये दोघांनी मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्याच्या घराबाहेर हल्ला केल्यानंतर दोघांना मुंबई सोडून गुजरात याठिकाणी फरार होण्यास सांगण्यात आलं होतं. एवढंच नाहीतर, दोघांनी त्यांच्याकडे असलेल्या बंदुक सुरतच्या नदीत फेकल्या आहेत.
दोघांना अटक झाल्यानंतर, बिहार याठिकाणी वातावरण तापलं आहे. दोघे देखील महसी गावातील असल्यामुळे तेथे पोलीस कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी विक्कीचे वडील साहब साह आणि सागर याच्या वडिलांसोबत तीन लोकांना ताब्यात घेतलं आहे. सध्या त्यांची चौकशी सुरु आहे. आपल्या गावातील मुले असा गुन्हा करू शकतात यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या गुन्ह्यात हे दोघे कसे अडकले याचं गावकऱ्यांना आश्चर्य वाटते.
चौकशीमध्ये सागरचे वडील म्हणाले, ‘आम्ही मजदुरी करून स्वतःची भूक भागवतो…’, बाहेर पैसे कमावण्यासाठी जात आहे, असं सांगत सागर घराबाहेर पडला होता. विक्कीच्या आई म्हणाल्या, ‘मुलगा होळी नंतर काम करण्यासाठी बाहेर गेला होता…’, सांगायचं झालं तर, दोन्ही आरोपींचे कुटुंबिय आणि गावकऱ्यांनी सोमवारी रात्री घटनेची माहिती बातम्यांच्या माध्यमातून मिळाली…
सांगायचं झालं तर, याआधी देखील अनेकदा सलमान खान याला मारण्यासाठी योजना तयार करण्यात आली. शिवाय अभिनेत्याला अनेकदा पत्र पाठवत देखील जीवेमारण्याची धमकी देण्यात आली. रविवारी सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना समोर आल्यानंतर अनेकांनी अभिनेत्याची भेट घेतली. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या घराबाहेरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर अभिनेत्याच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे.