मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केल्यानंतर हॉलिवूडच्या दिशेने आपला मोर्चा वळवला. आज जगातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा. यशाच्या उच्च शिखरावर चढणाऱ्या प्रियांकाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. जेव्हापासून प्रियांकाने हॉलिवूडमध्ये पादार्पण केलं आहे, तेव्हा पासून प्रियांका भारत आणि भारतीयांचं नाव वेग-वेगळ्या पद्धतीने मोठं करत आहे. आतापर्यंत ४० पेक्षा अधिक अंतरराष्ट्रीय मासिकांच्या कव्हर पेजवर प्रियांका झळकली.
४० पेक्षा अधिक अंतरराष्ट्रीय मासिकांच्या कव्हर पेजवर झळकल्यानंतर ब्रिटिश वोग मासिकाच्या कव्हर पेजवर देखील प्रियांका झळकली आहे. परदेशात हा सन्मान मिळवणारी प्रियांका पहिली भारतीय महिला ठरली आहे. प्रियांकाच्या या महत्त्वाच्या यशानंतर सर्वच स्तरातून अभिनेत्रीचं कौतुक होत आहे.
आज अनेक नव्या अभिनेत्रींसाठी आणि महिलांसाठी प्रियांका प्रेरणास्थानी आहे. ब्रिटिश वोगसोबत संवात साधताना अभिनेत्रीने स्वतःच्या लेकीबद्दल सांगितलं. ‘माझ्या मुलीचा जन्म फार लवकर झाला. जेव्हा मुलीचा जन्म झाला तेव्हा मी ऑपरेशन रुममध्येच होती. ती माझ्या हातापेक्षाही लहान होती. नर्स कसं इतक्या लहान मुलांचा सांभाळ करतात. ते देवाचं काम करतात.’ असं प्रियांका स्वतःच्या भावना व्यक्त करत म्हणाली.
जेव्हा निक आणि प्रियांका यांच्या मुलीवर उपचार सुरु होते, तेव्हा दोघे ऑपरेशन रुममध्येच होते. प्रियांका हिने सेरोगसीच्या माध्यमातून गेल्यावर्षी मुलीला जन्म दिला. प्रियांका आणि निक यांच्या मुलीचं नाव मालती मेरी असं आहे. मालती मेरी हिचा जन्म झाल्यानंतर ती जवळपास १०० दिवसांनंतर घरी आली.
प्रियांका कायम मुलीसोबत फोटो शेअर करत असते. पण अद्याप प्रियांकाने लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. नुकताच प्रियांका आणि निकने मालतीचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला.