शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत नुकताच लग्न केले आहे. सध्या सोशल मीडियावर सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला शत्रुघ्न सिन्हा यांच्या कुटुंबियांचा विरोध असल्याचे सातत्याने सांगितले जाते होते. मात्र, सोनाक्षी सिन्हा हिने सही करताना वडिलांचा हात पकडल्याचे बघायला मिळाले. मात्र, लग्नामध्ये कोणत्याच विधी करताना सोनाक्षी सिन्हाचे भाऊ लव आणि कुश हे दिसले नाहीत.
सोनाक्षी सिन्हा हिने सिव्हील मॅरेज झहीर इक्बाल याच्यासोबत केले. त्यानंतर मुंबईमध्ये खास पार्टाचे आयोजन करण्यात आले. या पार्टीला बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार पोहचले होते. विशेष म्हणजे लग्नाच्या पार्टीमध्ये धमाल करताना सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे दिसले. सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांनी खास डान्स देखील केला.
लग्न होऊन चार दिवस पूर्ण होताच लेट नाईट सोनाक्षी सिन्हा ही हॉटेलमध्ये चील मारताना दिसली. आता लग्नाला पाच दिवस पूर्ण झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हा हिने अत्यंत मोठा निर्णय घेतलाय. सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबतच्या लग्नानंतर आपल्या सोशल मीडियावर काही मोठे बदल हे केले आहेत.
सोनाक्षी सिन्हा हिने इंस्टाग्रामचा डीपी बदलला आहे. सोनाक्षी सिन्हा हिचा अगोदरचा डीपी तिचा फोटो होता. आता तिने बदल करत तिचा आणि झहीर इक्बालचा फोटो ठेवला आहे. सोनाक्षी सिन्हाने झहीरसोबतचा रोमांटिक फोटो ठेवलाय. चाहत्यांना सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा हा फोटो प्रचंड आवडल्याचे बघायला मिळतंय.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. शेवटी त्यांनी आता लग्न केले आहे. झहीर इक्बाल हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. मात्र, म्हणावा तसा त्याला चित्रपटांमध्ये धमाका करण्यास यश मिळाले नाही. सलमान खान आणि झहीर इक्बाल याचे वडील अत्यंत चांगले मित्र आहेत, याचा खुलासा स्वत: सलमान खानने केला होता.