Priyanka Chaudhary का नाही ठरली ‘Bigg Boss 16’ ची विजती? हरण्याची पाच कारणे समोर

| Updated on: Feb 13, 2023 | 5:01 PM

शिव ठाकरे आणि प्रियंका चौधरी यांच्यामध्ये 'कांटे की टक्कर' असताना एनसी स्टॅन ठरला 'Bigg Boss 16' चा विजेता... का हारली प्रियंका चौधरी? पाच कारणं आली समोर

Priyanka Chaudhary का नाही ठरली Bigg Boss 16 ची विजती?  हरण्याची पाच कारणे समोर
Priyanka Chaudhary
Follow us on

Priyanka Chahar Chaudhary Losing Reason : रविवारी ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) शोच्या विजेत्याची घोषणा झाली आणि चाहत्यांसह विजेत्याने मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केला. अभिनेता आणि बिग बॉस १६’ शोचा होस्ट सलमान खान (salman khan) याने विजेत्याचं नाव घोषित केलं आणि स्पर्धकांसह चाहते देखील चकित झाले. बिग बॉस १६’ मध्ये शिव ठाकरे (shiv thakare) आणि प्रियंका चौधरी यांमध्ये ‘कांटे की टक्कर’ होती. पण ‘बिग बॉस १६’ च्या ट्रॉफीवर एमसी स्टॅनचं नाव कोरलं गेलं. बिग बॉस फिनाले पूर्वी विजेती प्रियंकाच होईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. चाहत्यांनी प्रियंकाला विजेती म्हणून घोषित देखील केलं.

विजेता घोषित होण्यापूर्वी प्रियंका आणि शिव याच्या नावाची चर्चा होती. दोघांपैकी एक ‘बिग बॉस १६’ ची ट्रॉफी घरी घेवून जाईल अशी अपेक्षा चाहत्यांना देखील होती, पण तसं झालं नाही. सलमान खान याने एमसी स्टॅन याला विजेता म्हणून घोषित केलं. आता प्रियंका का जिंकली नाही याची पाच कारणे समोर आली आहेत… (Priyanka Chahar Chaudhary)

१. ‘बिग बॉस’ सुरु झाल्यापासून प्रियंका हिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. खुद्द ‘बिग बॉस’ने (bigg boss 16) सांगितलं होतं ती यंदाच्या सीझनच्या ट्रॉफीसाठी प्रियंका पात्र आहे. पण अन्य स्पर्धकांना ही गोष्ट आवडली नाही. त्यामुळे टॉप ३ मध्ये संपूर्ण खेळ बदलला.

२. सलमान खान (salman khan) याने देखील प्रियंकाचं भरभरुन कौतुक केलं. प्रत्येक दिवशी सलमान, प्रियंकाबद्दल काहीतरी बोलायचा. अशात सलमान भेदभाव करत आहे.. असं देखील प्रेक्षकांना वाटलं. म्हणून प्रियंकाला कमी वोट मिळाले.

३. फिनालेपूर्वी प्रियंका प्रचंड आक्रमक झाली आहे. ती कॅमेऱ्यासमोर शालीन भनोट (shalin bhanot) प्रमाणे वागणूक करत होती. सलमान खान याने प्रियंकाला सल्ला देखील दिला होता की, खेळ उलट दिशेने जात आहे. बाहेर प्रियंकाबद्दल अनेक नकारात्मक चर्चा रंगत आहेत.

४. प्रियंका चौधरी हिला शोमध्ये ‘जगतमाता’ असं टॅग देखील दिलं होतं. कारण ती कायम सर्वांसोबत भांडण करत होती. सतत स्वतःचं कौतुक करायची. यादरम्यान शिव आणि प्रियंका यांच्यामध्ये देखील वाद पेटले. (priyanka choudhary bigg boss)

५. प्रियंका तिचा मित्र अंकित गुप्तासोबत या शोमध्ये आली होती, पण या शोमध्ये आल्यानंतर तिच्या आणि अंकितच्या नात्याबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले. यामागचं कारण प्रियंका कायम अंकितवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत होती. तिने कायम अंकितला अन्य महिला स्पर्धकांपासून दूर राहण्यास सांगितलं. (priyanka choudhary and ankit gupta)