‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ फेम मानवी गगरूने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, पहा फोटो

| Updated on: Feb 23, 2023 | 2:58 PM

मानवी आणि वरुण यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. लग्नानंतर हे दोघं इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींसाठी सनडाउन पार्टी होस्ट करणार आहेत.

1 / 5
'फोर मोअर शॉट्स प्लीज' फेम अभिनेत्री मानवी गगरूने गेल्या महिन्यात साखरपुडा केला होता. आज (गुरुवार) तिने कुमार वरुणशी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

2 / 5
मानवीने लग्नात लाल रंगाची एब्रॉयड्री साडी नेसली होती. त्यावर पोलकी डायमंड ज्वेलरी आणि मांग टिका असा तिचा लूक आहे. तर कुमारने आयव्हरी रंगाची शेरवानी आणि त्यावर मोत्याचा नेकलेस घातला होता.

3 / 5
कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत आम्ही 23 फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. तुमच्याकडून आम्हा दोघांना भरपूर प्रेम मिळालं. आता या नवीन प्रवासासाठी आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.

4 / 5
मानवीच्या या फोटोंवर श्रिती झा, सयानी गुप्ता, गौहर खान, जितेंद्र कुमार यांसारख्या सेलिब्रिटींनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

5 / 5