नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा वाढदिवस. चलो, गीता गोविंदम, डिअर कॉम्रेड, सरिले नीकेव्वरू, भीष्मा यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. रश्मिका एक्स्प्रेशन क्वीन म्हणूनही ओळखली जाते.
सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या यादीत रश्मिकाचाही समावेश आहे. रश्मिकाला आलिशान गाड्यांची आवड असून तिच्याकडे 50 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ- सी क्लास ही गाडी आहे. याशिवाय ऑडी क्यू 3, टोयोटा इनोव्हा, हुंडाइ क्रेटा या गाड्यासुद्धा तिच्या कलेक्शनमध्ये आहेत.
बेंगळुरूमध्ये रश्मिकाचा बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास 8 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. याशिवाय तिने मुंबईतही घर विकत घेतलं आहे. कामानिमित्त तिला अनेकदा मुंबई आणि हैदराबादला ये-जा करावी लागते. म्हणून तिने मुंबईतही हक्काचं घर घेतलं.
रश्मिकाकडे लग्झरी बॅग्सचंही कलेक्शन आहे. ती वापरत असलेल्या एकेका डिझायनर बॅग्सची किंमत ही लाखोंच्या घरात आहे. रश्मिकाचे स्टायलिश लूक्स नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात.
त्याचप्रमाणे ट्रेंडी फुटवेअरचंही कलेक्शन रश्मिकाकडे आहे. वयाच्या 25 व्या वर्षीच रश्मिकाने चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.