अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसजवळ ‘हॉलिवूड हिल्स’ भागात भीषण वणवा पेटला. बुधवारी रात्री या वणव्याने अक्षरश: रौद्र रुप धारण केलं. हा वणवा विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत किमान पाच जणांचा या वणव्यामुळे मृत्यू झाला आहे. कॅलिफोर्निया आणि लॉस एंजेलिसमधील किमान सहा ठिकाणी हे वणवे पेटल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आणीबाणी घोषित केली असून वण्यावरून लाखो नागरिकांची सुटका करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. या वणव्यामध्ये ‘हॉलिवूड हिल्स’ हा महत्त्वाचा भाग जळून खाक होत आहे. जोराच्या वाऱ्यामुळे अग्निशामक दलाला बचावकार्यात अडथळे येत आहेत.
वणव्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने लॉस एंजेलिस सोडलं आहे. तर पॅसिफिक पॅलिसेड्स भागात जॅमी ली, मार्क हॅमिल यांसारख्या अभिनेते- अभिनेत्रींची घरं या ठिकाणी आहेत. अनेकांना त्यांची घरं सोडावी लागली आहेत. पॅसिफिक पॅलिसेड्स आणि हॉलिवूड हिल्स भागातील नागरिकांना या वणव्याची सर्वाधिक झळ बसली आहे. या भागात नागरिकांची आलिशान घरं आहेत. आगीत कोट्यवधी डॉलरचं नुकसान झालं असून एक हजारांहून अधिक घरांना फटका बसला आहे.
बिली क्रिस्टल, पॅरिस हिल्टन, यूजीन लेव्ही, लेटन मीस्टर, ॲडम ब्रॉडी, ॲना फॅरिस, रिकी लेक, कॅरी एल्वेस, कॅमरॉन मॅथिसन, स्पेन्सर प्रॅट, हेईडी मोंटॅग यांसारख्या सेलिब्रिटींची वणव्यात जळून खाक झाली. मॉडेल, गायिका आणि अभिनेत्री पॅरिस हिल्टनने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘कुटुंबीयांपासून बसून ही वणव्याची बातमी पाहणं आणि मालिबूमधील आमचं घर जळून खाक होताना पाहणं.. ही अशी गोष्ट आहे जी कोणालाच कधी अनुभवावी लागू नये. त्या घरात आमच्या असंख्य आठवणी होत्या. तिथे फिनिक्सने पहिलं पाऊल टाकलं होतं आणि तिथे आम्ही आयुष्यभराच्या आठवणी निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. नुकसान प्रचंड झालं असलं तरी मी आणि माझे कुटुंबीय सुरक्षित आहेत, याबद्दल मी कृतज्ञ आहे.’
I’m standing here in what used to be our home, and the heartbreak is truly indescribable.💔🥺 When I first saw the news, I was in complete shock—I couldn’t process it. But now, standing here and seeing it with my own eyes, it feels like my heart has shattered into a million… pic.twitter.com/mJcFjQVVX7
— Paris Hilton (@ParisHilton) January 10, 2025
लॉस एंजेलिसच्या जंगलात लागलेल्या वणव्याची धग हॉलिवूड साइनपर्यंत पोहोचली आहे. हे साइन शहरातील सांता मोनिका पर्वतातील माऊंट ली इथं आहे. अमेरिकेचं सांस्कृतिक प्रतीक म्हणून या हॉलिवूड साइनकडे पाहिलं जातं.