मुंबई: 8 फेब्रुवारी 2024 | ‘शार्क टँक इंडिया’ हा अत्यंत अनोखा शो अल्पावधीतच लोकप्रिय झाला. या शोमध्ये छोटे-मोठे व्यवसाय करणारे, स्टार्ट अप्स चालवणारे गुंतवणूक मागण्यासाठी येतात आणि परीक्षक त्यात गुंतवणूक करायची की नाही हे ठरवतात. या शोमुळे अनेक छोट्या व्यवसायांना चालना मिळाली आहे. सध्या शार्क टँक इंडियाचा तिसरा सिझन सुरू आहे. या शोच्या प्रत्येक सिझनमध्ये परीक्षक कोट्यवधी रुपये विविध व्यवसायाच गुंतवतात. या परीक्षकांना व्यवसायाचं असलेलं ज्ञान आणि त्यांची गुंतवणूक रक्कम पाहून अनेकांना वाटत असेल की त्यांचा स्वत:चा व्यवसाय जोरात चालत असेल. मात्र प्रत्येकाच्या बाबतीत हे खरं नाही. शार्क टँक इंडिया या शोमध्ये परीक्षक म्हणून हजेरी लावणारे बरेच बिझनेसमन हे स्वत: तोट्यात आहेत. ‘बोट’ या कंपनीचे अमन गुप्ता, ‘शुगर कॉस्मेटिक्स’ची विनीता सिंह, ‘झोमॅटो’चे दीपिंदर गोयल यांसह इतर परीक्षकांच्या कंपन्यांचा महसूल किती आहे आणि ते किती तोट्यात आहेत, ते पाहुयात..
रितेश अग्रवाल यांचा OYO
तोटा- 1,287 कोटी रुपये
महसूल- 5,464 कोटी रुपये
विनीता सिंगचा SUGAR कॉस्मेटिक्स
तोटा- 76 कोटी रुपये
महसूल- 420 कोटी
अमन गुप्ता यांचा ‘बोट’
तोटा- 129.4 कोटी रुपये
महसूल- 3,377 कोटी रुपये
दीपिंदर गोयल यांचा ‘झोमॅटो’
तोटा- 971 कोटी रुपये
महसूल- 7,079 कोटी रुपये
अमित जैन यांचा ‘कार देखो’
तोटा – 562 कोटी रुपये
महसूल- 2,331 कोटी रुपये
अझहर इक्बालचे ‘इनशॉर्ट्स’
तोटा- 309.75 कोटी रुपये
महसूल- 180.90 कोटी रुपये
रॉनी स्क्रूवालाचं ‘अपग्रॅड’
तोटा – 1,142 कोटी रुपये
महसूल – 1,194 कोटी रुपये
वरुण दुआचा ‘ACKO इन्शुअरन्स’
तोटा- 738 कोटी रुपये
महसूल- 1,758 कोटी रुपये
नमिता थापरचा ‘एमक्योअर फार्मास्युटिकल्स’
नफा – 160 कोटी रुपये
महसूल – 3107 कोटी रुपये
पीयूष बन्सल यांचा ‘लेन्सकार्ट’
नफा- 260 कोटी रुपये
महसूल- 3,780 कोटी रुपये
राधिका गुप्ताचा ‘एडलवाईस म्युच्युअल फंड’
नफा- 17.7 कोटी रुपये
महसूल – 216 कोटी रुपये
(मागील आर्थिक वर्ष 2022-23 चे आकडे)
‘शार्क टँक इंडिया’च्या आठ परीक्षकांच्या कंपन्या तोट्यात तर तीन परीक्षकांच्या कंपन्या नफ्यात आहेत. ‘शादी डॉटकॉम’चे अनुपम मित्तल यांच्या व्यवसायाचे आकडे उपलब्ध नाहीत.