Gadar | ‘गदर’ची कथा ऐकून गोविंदाचा थेट नकार; म्हणाला “हा तर हिंदू-मुस्लिम..”

| Updated on: Aug 30, 2023 | 1:14 PM

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर : एक प्रेम कथा' या चित्रपटासाठी दिग्दर्शकांची पहिली पसंत गोविंदा होती, अशी चर्चा सुरू आहे. त्यावर अखेर 'गदर'चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी मौन सोडलं आहे.

Gadar | गदरची कथा ऐकून गोविंदाचा थेट नकार; म्हणाला हा तर हिंदू-मुस्लिम..
Sunny Deol and Govinda
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : अनिल शर्मा दिग्दर्शित आणि सनी देओलची मुख्य भूमिका असलेल्या ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. गेल्या 19 दिवसांत या चित्रपटाने तब्बल 465.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. ‘गदर’च्या पहिल्या भागातही सनी देओलनी तारा सिंगची मुख्य भूमिका साकारली होती. मात्र या भूमिकेसाठी सनी देओलच्या आधी गोविंदाला विचारण्यात आलं होतं. मात्र त्याने स्पष्ट नकार दिल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. या चर्चांवर अखेर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी मौन सोडलं आहे.

‘गदर’च्या कथेवर गोविंदाची प्रतिक्रिया

‘बॉलिवूड हंगामा’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अनिल शर्मा यांना गोविंदाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “गदर : एक प्रेम कथा या चित्रपटासाठी मी कधीच गोविंदाचा विचार केला नव्हता. मी त्याच्यासोबत महाराजा या चित्रपटात काम केलं होतं. एके दिवशी, मी सहज त्याला गदरची कथा सांगितली. तेव्हा तो म्हणाला, मी हा चित्रपट करू शकत नाही. मला त्याला चित्रपटात घ्यायचं होतं म्हणून मी कथा ऐकवली, असा त्याचा गैरसमज झाला होता.”

गोविंदाने का दिला नकार?

‘गदर’ची कथा ऐकल्यानंतर त्यातील हिंदू-मुस्लिम विषयामुळे गोविंदाने नकार दिल्याचं अनिल शर्मा यांनी सांगितलं. याविषयी ते पुढे म्हणाले, “गोविंदाला कथा सांगण्याआधीच मी त्याला हे स्पष्ट केलं होतं की मी असा एक चित्रपट बनवतोय आणि त्यात सनी देओलची मुख्य भूमिका असेल. तेव्हा त्याने मला विचारलं की, चित्रपटाची कथा काय आहे? म्हणून मी गोविंदाला गदरची कथा सांगितली. कथा ऐकताच तो म्हणाला, ‘नाही, मी हा चित्रपट करूच शकत नाही कारण यामध्ये हिंदू-मुस्लिमचा एवढा वाद आहे.’ आमच्यात फक्त इतकाच संवाद झाला. पण कदाचित गोविंदाला असा गैरसमज झाला असावा की मी त्याला गदरची ऑफर दिली. तसं पाहिल्यास, गोविंदा त्यावेळी सुपरस्टार होता, त्यामुळे त्याचीही निवड वाईट नसती. पण माझ्या डोक्यात पंजाबी हिरोची भूमिका होती आणि ती फक्त सनी देओलनेच साकारली असती.”

हे सुद्धा वाचा