Gadar | कोणाच्या कबरी समोर बसून ढसाढसा रडला सनी देओल? मोठं रहस्य येणार समोर

| Updated on: Jun 14, 2023 | 11:25 AM

'गदर' फेम अभिनेता सनी देओल कोणाच्या कबरी समोर बसून रडतोय ढसाढसा? फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही पडतील अनेक प्रश्न.. सर्वत्र अभिनेत्याची चर्चा...

Gadar | कोणाच्या कबरी समोर बसून ढसाढसा रडला सनी देओल? मोठं रहस्य येणार समोर
Follow us on

मुंबई | अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा ‘गदर’ सिनेमामुळे चर्चत आले आहेत. अनेक वर्षांनंतर ‘गदर’ सिनेमाचा दुसरा भाग ‘गदर २’ चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र ‘गरद २’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. ‘गदर’ सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता दुसऱ्या भागाची चर्चा सुरु आहे.. चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर सर्वत्र ‘गदर २’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. ‘गदर २’ सिनेमाचं टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ट्रेलर आणि सिनेमाच्या प्रतीक्षेत चाहते आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या आहेत..

टीझरमध्ये सनी कोणाच्या तरी कबरीसमोर बसून रडताना दिसत आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमात अनेक रहस्य आहेत, असं दिसून येत आहे. सनी ज्या कबरीसमोर बसून रडत आहे, ती कबर अभिनेत्री अमिषा पटेल म्हणजे तारा सिंग यांची पत्नी सकिना हिची असल्याचा अंदाज अनेक जण वर्तवत आहेत.

टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमात सकिनाचं निधन होईल का? सकिना आणि तारा सिंग यांची जोडी तुडणार का? अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित होत आहेत. पण चाहत्यांना निराश होण्याचं कारण नाही. कारण मिळालेल्या माहितीनुसार, सनी ज्या कबरीसमोर बसून रडत आहे, ती सकिना म्हणजे अमिषा पटेल हिची नसून अन्य कोणाची आहे…

एवढंच नाही तर, निर्माते स्पेशल टीझर प्रदर्शित करत अमिषा पटेल हिने साकारलेल्या भूमिकेची एक झलक दाखवणार आहेत… त्यामुळे सनी देओलच्या टीझरनंतर अमिषा हिला देखील पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.. सिनेमाबद्दल चाहत्यांच्या मनात असलेली उत्सुकता चाहत्यांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा सुरु आहे.

अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल ‘गदर २’ सिनेमा ११ ऑगस्ट २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘गदर २’मध्ये आता तारा सिंग म्हणजेच सनी देओलच्या मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे. सनी देओलच्या मुलाची भूमिका अभिनेता उत्कर्ष साकारणार आहे.

शूटिंगसाठी लखनऊ आणि महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये पाकिस्तानप्रमाणे सेट तयार करण्यात आला. गदर २ मधील पाकिस्तानच्या सीनसाठी लखनऊमध्ये तब्बल 50 दिवस शूटिंग करण्यात आली.

आजही ‘गदर’ सिनेमा चाहते तितक्याच आवडीने पाहतात. दरम्यान प्रेक्षक ‘गरद २’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गदर सिनेमाच्या यशानंतर ‘गदर २’ सिनेमाच्या चर्चा आता रंगत आहेत.