मुंबई : सनी देओल याचा गदर 2 (Gadar 2) हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. गदर 2 चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले असून चाहत्यांचा मोठा प्रतिसाद हा चित्रपटाला मिळताना दिसत आहे. तब्बल 22 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर गदर 2 हा चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. विशेष म्हणजे गदर 2 चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ हे बघायला मिळत आहे. गदर 2 चित्रपटात सनी देओल याच्यासोबत अमीषा पटेलही मुख्य भूमिकेत आहे. गदर 2 चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना चित्रपटाची संपूर्ण टीम ही दिसली. गदर 2 चा धमाका अजूनही सुरूच आहे.
गदर 2 चित्रपटाचे आता आठव्या दिवशीचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे पुढे आले आहे आणि चित्रपटाने मोठा धमाका केल्याचे दिसत आहे. गदर 2 हा चित्रपट आता 300 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ होऊ शकते असेही सांगितले जात आहे. अवघ्या आठ दिवसांमध्येच चित्रपट 300 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झालाय.
शनिवार आणि रविवारमध्ये गदर 2 चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ होणार असल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. गदर 2 चित्रपट शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटाचे रेकाॅर्ड तोडू शकतो, असेही सांगितले जात आहे. यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट आहे. मात्र, पठाणचे रेकाॅर्ड गदर 2 हा आरामात तोडू शकतो.
अवघ्या आठ दिवसांमध्ये गदर 2 चित्रपटाने 300 कोटींच्या मोठा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे अजूनही चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल क्रेझ बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे गदर 2 हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरबाहेर मोठी गर्दी केल्याचे देखील दिसत आहे. याचे काही व्हिडीओ ही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये लोकांची मोठी गर्दी ही थिएटरबाहेर दिसत होती. हा व्हिडीओ अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. सनी देओल याच्या भूमिकेचे काैतुकही चाहत्यांकडून केले जात आहे. सर्वांनाच गदर 2 चित्रपट तूफान आवडल्याचे दिसत आहे.
गदर 2 चित्रपटाबद्दल फक्त चाहत्यांमध्येच क्रेझ नाहीये तर चक्क अभिनेत्यांमध्येही मोठी क्रेझ असल्याचे बघायला मिळाले. बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन हा देखील काही दिवसांपूर्वीच गदर 2 हा चित्रपट बघण्यासाठी गेला होता. यावेळी इतर चाहत्यांप्रमाणेच ज्यावेळी सनी देओल हा हँडपंप उखडून हातामध्ये घेतो, त्यावेळी एखाद्या चाहत्याप्रमाणेच कार्तिक आर्यन हा थिएटरमध्ये ओरडताना ऐकून आले.