मुंबई : 20 सप्टेंबर 2023 | सर्वसामान्यच नाही तर, सेलिब्रिटी देखील गणेशोत्सवाचा आनंद घेत आहेत. १९ सप्टेंबर म्हणजे मंगळवारी गणरायाचं आगमन झाल्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील स्वतःच्या घरी गणपतीचं स्वागत केलं आहे. सोशल मीडियावर देखील गणपतीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अभिनेता शाहरुख खान याने देखील ‘मन्नत’मध्ये गणरायाचं मोठ्या थाटात स्वागत केलं आहे. शाहरुख खान याच्या घरी देखील गणरायाची स्थापना झाली आहे. खुद्द किंग खान याने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या किंग खान याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘जवान’ सिनेमाच्या दमदार यशानंतर शाहरुख खान गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करताना दिसत आहे. गणपतीचा फोटो पोस्ट करत अभिनेता कॅप्शनमध्ये म्हणाला, ‘गणपती बाप्पा तुमचं घरात स्वागत करत आहे… तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छ… गणपती आपल्या सर्वांना सदैव सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि अनेक मोदक खायला देवो…’ असं म्हणाला आहे.
सोशल मीडियावर सर्वत्र शाहरुख खान याने पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा रंगत आहे. चाहत्यांनी देखील शाहरुख खान याच्या पोस्टवर कमेंट करत अभिनेत्याला आणि खान कुटुंबाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मन्नत’ मध्ये सध्या गणेशोत्सवानिमित्त आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान आणि अभिनेत्याच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.
शाहरुख खान याच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी गणेश चतुर्थी साजरी केली आहे. अभिनेत्री जान्हवी कपूर, सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा आणि शिल्पा शेट्टीने त्यांच्या घरी गणरायाची स्थापना केली आहे.
शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेला ‘जवान’ सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करण्यास यशस्वी ठरला आहे. सिनेमातील किंग खान याची दुहेरी भूमिका चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. ‘जवान’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ५०० कोटू रुपयांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे येत्या काळात सिनेमा किती कोटींची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.