निळू फुलेंवरील ‘त्या’ व्हिडीओवरून लेकीचा संताप; प्रसिद्ध व्यक्तीला फटकारत म्हणाल्या…

| Updated on: Oct 28, 2024 | 2:13 PM

निळू फुलेंवरील 'त्या' व्हिडीओवरून लेकीचा संताप; प्रसिद्ध व्यक्तीला फटकारत म्हणाल्या, 'तुझ्या...', व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील व्यक्त केला संताप...

निळू फुलेंवरील त्या व्हिडीओवरून लेकीचा संताप; प्रसिद्ध व्यक्तीला फटकारत म्हणाल्या...
Follow us on

‘गाव तसं चांगलं पण वेशीला टांगल’, ‘माझा पती करोडपती’, ‘हमाल दे धमाल’, ‘आई’, ‘हऱ्या नऱ्या झिंदाबाद’, ‘बिन कामाचा नवरा’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेते निळू फुले यांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही निळू फुले आपल्यात नाहीत, पण त्यांच्या असंख्य आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहे. अनेक सिनेमांमध्ये निळू फुले यांनी खलनायकाच्या भूमिकेला देखील न्याय दिला. त्यांचे अनेक डायलॉग आजही चाहत्यांमध्ये चर्चेत असता आणि त्यापैकी एक म्हणजे ‘बाई वाड्यावर या’

‘बाई वाड्यावर या’ या डायलॉगवर आजही अनेक मीम्स आणि व्हिडीओ तयार केले जातात. अशा एका व्हिडीओवर निळू फुले यांचे लेक आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘बाई वाड्यावर या’ या डायलॉगचा वापर करत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जातो.

पवन वाघूलकर आणि सायली पाठक या दोन कंटेन्ट क्रिएटर्स यांनी हा व्हिडिओ बनवला आहे. व्हिडीओमध्ये ‘बाई वाड्यावर या’ या डायलॉगचा वापर केला आहे. व्हिडीओवर संताप व्यक्त करत गार्गी फुले म्हणाल्या, ‘हे किती हिडीस आहे. माझ्या बाबांना असं कृपा करून बदनाम करू नाका… सायली फाटक तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती…’ असं म्हणत गार्गी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. एक नेटकरी केमेंट करत म्हणाला, ‘कशाला पिढी खराब करतो… यापेक्षा काहीतरी काम करुन पोट भरना…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘निळू फुले यांना बदनाम करायचं ठरवलं आहे का?’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘निळू फुलेंची सरळ सरळ बदनामी करताय. स्वतःच पोट भरण्यासाठी एका थोर कलाकाराचा अपमान करताय.’ व्हिडीओला अनेकांनी विरोध केला आहे.

अभिनेता प्रसाद ओक याने देखील व्हिडीओवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘निळू फुले कोण होते आणि काय दर्जाचे होते हे समजायला यांना 100000 जन्म घ्यावे लागतील. गार्गी फुले सोडून दे. ‘निळू फुले’ म्हणजे ‘बाई वाड्यावर या..’एवढीच यांची कुवत आहे…”