मुंबई : मोटिव्हेशनल स्पीकर गौर गोपाल दास यांचे व्हिडीओ कायम सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. त्यांचे व्हिडीओ अनेक तरुण मंडळी ऐकत असतात. अनेकांना प्रेरणाऱ्या देणाऱ्या गौर गोपाल दास यांना भेटण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. नुकताच त्यांनी विनोदवीर कपिल शर्माच्या ‘द कमिल शर्मा शो’ मध्ये हजेरी लावली. शोमध्ये गौर गोपाल दास यांनी प्रेक्षकांसोबत आणि कपिलसोबत अनेक विषयांवर गप्पा मारल्या. सध्या शोचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. शोमध्ये कपिलने गौर गोपाल दास यांना अनेक प्रश्न देखील विचारले.
व्हिडीओमध्ये गौर गोपाल दास सुरूवातीला प्रवेश करतात. त्यानंतर कपिल त्यांच्या मोटिव्हेशनल व्हिडीओंचा उल्लेख करत विचारतो, ‘सर मी तुमचा एक व्हिडीओ पाहिला आहे. ज्यामध्ये तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडबद्दल बोलत आहात. सर तुम्हाला देखील विद्यार्थी असल्याचा अनुभव आहे. तर तुम्ही कधी प्रेमात पडला आहात?’
कपिलच्या प्रश्नावर गौर गोपाल दास यांनी असं उत्तर दिलं ज्यामुळे प्रत्येक जण हसायला लाहला. गौर गोपाल दास म्हणाले, ‘कपिल आज जरा जास्तच लिबर्टी घेत आहे…’, सध्या त्यांचा हा विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये फक्त गौर गोपाल दास नाही, तर क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती देखील दिसत आहेत.
गौर गोपाल दास यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आयुष्यात येणाऱ्या चांगल्या-वाईट घटनांबद्दल ते बोलत असतात. एवढंच नाही, तर एखाद्या संकटातून बाहेर पडण्यास देखील ते अनेकांची मदत करत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात कसं स्वतःला घडवायला हवं याबद्दल ते सांगत असतात. पण नेहमी प्रेरणा देणारे
गौर गोपाल दास यांचा विनोदी अंदाज देखील प्रेक्षकांनी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये अनुभवला.
व्हिडीओमध्ये, सुनीता राव, श्वेता शेट्टी, अल्ताफ राजा, शब्बीर कुमार यांसारखे कलाकार देखील दिसत आहेत. ९० च्या दशकातील गायक देखील शोमध्ये त्यांच्या सुरांची जादू दाखवता दिसत आहेत. सध्या कपिलच्या शोमधील व्हायरल होत असलेला व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस पडताना दिसत आहे.