मुंबईः कोणत्याही कलाकाराला कोणतीही व्यक्तिरेखा साकारायची असेल तर त्याच्या अभिनयानुसार त्याला शारीरिकदृष्ट्याही तयारी करावी लागते. कारण एकादी व्यक्तिरेखा, त्याच्या शरीराची ढब, त्याची भाषा त्या कलाकाराच्या व्यक्तिरेखेपेक्षा वेगळे असेल तर त्याच्यासाठी त्याला वेगळेच प्रयत्न करावे लागतात. कोणतीही व्यक्तीरेखा साकारायची असेल तर त्यातील बारकाव्यासह त्या-त्या कलाकाराला ती निभावावी लागते, आणि ती टीव्हीवरील मालिका जर ऐतिहासिक असेल तर त्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न करावे लागतात.
सोनी टीव्हीवर (Sony Tv) पुण्यश्लोक अहिल्याबाई (Punyashlok Ahilyabai) ही मालिका राणी अहिल्याबाई होळकर आणि त्यांचे पती खंडेराव होळकर (Khanderao Holkar)यांच्या जीवनावर आधारित आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई ही मालिका एका अशा स्त्रीच्या शक्तीची आणि तिच्यातील हिम्मतीची गोष्ट सांगत की जिणे 18 व्या शतकात सामाजिक अनिष्ठ रुढी परंपराविरुद्ध लढली आणि इतिहासावर आपले नाव कोरले आणि अनेकांना प्रेरणा दिली.
अहिल्याबाईंप्रमाणेच त्यांचे पती खंडेराव ही व्यक्तिरेखा साकारणेही आव्हानात्मक आहे. ही भूमिका अभिनेता गौरव अमलानी साकारत आहे. या व्यक्तिरेखेसाठी त्याने खूप मेहनतही घेतली आहे.
गौरव अमलानी म्हणतो की, कोणतीही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तुम्ही स्वतःत बदल केले पाहिजेत. खंडेराव कसा चालतो, उभा राहतो आणि त्याचे व्यक्तिमत्त्व काय सांगते यासारख्या बारीक गोष्टीवरही आपण लक्ष दिले पाहिजे.
तो हे ही सांगतो ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारत असताना आपल्यामध्ये शारीरिक बदलला अधिक महत्व दिले पाहिजे. ज्यावेळी प्रेषक मालिकेतील ऐतिहासिक व्यक्तिरेखेबरोबर जोडले जातात त्यावेळी ते त्या व्यक्तिरेखेच्या शारीरिक रुपाकडेही हे ते तितकेच लक्ष देतात. त्यामुळे प्रेषक त्या व्यक्तिरेखेबरोबर एक नात जोडतात. एक राजा आणि खास करुन खंडेराव सारखी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आपण खाण्यापिण्यावर खूप बंधनं घातली असल्याचे तो सांगतो. राजासारखी व्यक्तिरेखा बनवण्यासाठी पर्सनल ट्रेनर बरोबर ठराविक व्यायाम करतो असं ते सांगतात.
संबंधित बातम्या
झोपडपट्टीतील मुलांच्या भविष्याला आकार देणारा ‘झुंड’; संघर्ष आणि जिद्दीची कहानी
मलायका अरोराच्या बिकनी फोटोवरची अर्जुन कपूरची कमेंट पाहिली आहे का?, म्हणून तो आता चोर ठरतोय