अभिनेता शाहरुख खानला बुधवारी उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता किंग खानची प्रकृती देखील स्थिर आहे. अहमदाबादच्या केडी रुग्णालयात अभिनेत्यावर उपचार सुरु होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर किंग खान आयपीएलमध्ये स्वतःच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहोचला. अभिनेत्याची प्रकृती स्थिर नसताना देखील किंग खान कुटुंबासोबत स्टेडिअमवर उपस्थित होता. अशात शाहरुख खान आजारी असताना अभिनेत्याची काळजी घेण्यासाठी पत्नी गौरी खान देखील उपस्थित होती.
सध्या गौरी खान हिचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये गौरी सतत किंग खानची काळजी घेताना दिसत आहे. लोकांच्या गर्दीत गौरी सतत शाहरुख याला मास्क लावण्यासाठी सांगत आहे. गौरी ज्याप्रकारे शाहरुखची काळजी घेत आहे…. चाहते देखील गौरी हिचं कौतुक करताना दिसत आहे.
Gauri protecting her pasandida human and making him wear mask every now and then is my favourite genre of winning in love 💜 #ShahRukhKhan #GauriKhan pic.twitter.com/dfIOCiBeOI
— Neel Joshi (@iamn3el) May 27, 2024
व्हिडीओमध्ये शाहरुख सतत मास्क काढताना दिसत आहे. तर गौरी शाहरुख याला मास्क लावायला सांगत आहे. किंग खान देखील पत्नीचं ऐकताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर शाहरुख – गौरी यांचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘प्रेम असावं तर असं…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘शाहरुख खानची काळजी घेत आहे की, फार भावूक करणारा क्षण आहे…’ अन्य एक नेटकरी म्हणाली, ‘गौरी तिच्या आवडतीच्या माणसाला प्रोटेक्ट करत आहे…’, किंग खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो आता अभिनेता प्रकृतीमुळे चर्चेत आला आहे.
शाहरुख खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किंग’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात शाहरुख यांच्यासोबत लेक सुहाना खान देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र शाहरुखच्या नव्या सिनेमाची देखील चर्चा सुरु आहे.