मुंबई : शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट मोठा धमाका करताना दिसतोय. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले. शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली. मुळाच म्हणजे शाहरुख खान याचे चाहते सध्या आनंदात आहेत. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाने मोठा केला.
शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाण हाच ठरलाय. शाहरुख खान हा पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोशन करताना दिसला. विशेष म्हणजे जवान रिलीज होण्याच्या अगोदर त्याने आपल्या चाहत्यांसाठी खास सेशनचे आयोजन केले. या सेशनमध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसला.
शाहरुख खान याच्या जवानने ओपनिंग डेला तूफान कमाई केली.शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाबद्दल फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही हवा बघायला मिळाली. शाहरुख खान याचा आता काही दिवसांमध्येच डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येईल. डंकी चित्रपटाचे शूटिंग करताना शाहरुख खान हा कश्मीरमध्ये दिसला.
शाहरुख खान याच्या जवान चित्रपटाचे चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात काैतुक केले जातंय. फक्त चाहतेच नाही तर सेलिब्रेटी देखील शाहरुख खान याचे काैतुक करताना दिसत आहेत. नुकताच क्रिकेटर गाैतम गंभीर याने एक अत्यंत खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. या पोस्टसोबत त्याने खास फोटो शेअर केलाय. गाैतम गंभीर याने शेअर केलेली ही पोस्ट शाहरुख खान याच्यासाठी आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो आणि शाहरुख खान दिसतोय.
गाैतम गंभीर याने फोटो शेअर करत लिहिले की, शाहरुख केवळ बॉलिवूडचा राजा नाही तर हृदयाचा राजा आहे. जेव्हाही आम्ही भेटतो तेव्हा प्रेम आणि आदराने. तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, सर्वश्रेष्ठ SRK…आता गाैतम गंभीर याने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. चाहते या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.