‘सबसे कातील, गौतमी पाटील’ हिची दिवाळी पहाट ठाण्यात; गौतमी हिच्या तालावर थिरकली तरुणाई

| Updated on: Nov 12, 2023 | 1:45 PM

Gautami Patil : गौतमी पाटील हिच्या उपस्थितीत ठाणेकरांची दिवाळी पहाट; ‘सबसे कातील, गौतमी पाटील' हिच्या तालावर थिरकली तरुणाई... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौतमी पाटील हिचीच चर्चा... गौतमी हिचे फोटो व्हिडीओ सर्वत्र व्हायरल

‘सबसे कातील, गौतमी पाटील हिची दिवाळी पहाट ठाण्यात; गौतमी हिच्या तालावर थिरकली तरुणाई
Follow us on

मुंबई | 12 नोव्हेंबर 2023 : देशात प्रत्येक ठिकाणी दिवाळी सण मोठ्या थाटात साजरा होत आहे. पण सध्या ठाण्यातील दिवाळी पहाट तुफान चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसं आहे. ठाण्यात दिवाळी पहाटसाठी गौतमी पाटील होती. दिवाळी पहाट निमित्त शिंदे गटाततील माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात गौतमी पाटील हिने लावणी सादर करत तरुणाईला मंत्र मुग्ध केलं. ठाण्यात दिवाळी पहाटसाठी उपस्थित राहिलेल्या गौतमी पाटील हिचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

ठाण्यातील चिंतामणी चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याळेळी ठाण्यातील चिंतामणी चौकात तरुणाई जल्लोष करताना दिसली. सकाळ पासून तरुणाई बेधुंद पणे डीजे च्या तालावर जल्लोष करताना दिसत होती. दिवाळी पहाट निमित्त तरुणाई गौतमी पाटील हिच्या तालावर थिरकली.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे खुद्द गौतमी पाटील हिने शनिवारी एक व्हिडीओ पोस्ट करत दिवाळी पहाटसाठी ठाण्यात येणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली. गौतमी हिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौतमी पाटील हिची चर्चा रंगत आहे.

 

 

सांगायचं झालं तर, गौतमी पाटील हिच्या प्रत्येक कार्यक्रमाला लोकांची गर्दी जमते. सबसे कातिल गौतमी पाटील म्हणून ख्याती मिळवलेल्या गौतमीची लोकप्रियता अजूनही कायम आहे. आता तर तिने सिनेक्षेत्रात पदार्पण केल्याने तिची क्रेझ अधिकच वाढली आहे.

गौतमी पाटील लवकरच “घुंगरू एक संघर्ष” सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. महाराष्ट्रभर आपल्या अदाकारीने तरुणांच्या ह्रुदयात स्थान निर्माण करणारी गौतमी पाटील हिच्या नव्या सिनेमाच्या प्रतीक्षेत आता चाहते आहेत. गौतमीचा पहिलाच सिनेमा असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

गौतमी पाटील सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमलेली असते. आता गौतमी मोठ्या पडद्यावर झळकल्यानंतर चाहत्यांची किती गर्दी जमणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.