मुंबई : प्रसिद्ध गायक पंकज उधास यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पंकज उधास यांच्या निधनाबद्दल त्यांच्या मुलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली. 72 व्या वर्षी पंकज उधास यांनी शेवटचा श्वास घेतला. पंकज उधास यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली. चिट्ठी आई है आई है… पंकज उधास यांचे सर्वात गाजलेले गाणे आहे. पंकज उधास यांच्या जाण्याने देश एका मोठ्या गायकाला मुकला आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत पंकज उधास यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त केले आहे. पंकज उधास यांचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे.
पंकज उधास यांच्या लाईव्ह कार्यक्रमाला चाहत्यांची मोठी गर्दी ही कायमच बघायला मिळायची. हेच नाही तर पंकज उधास यांचे एक चॅनल देखील होते. या चॅनलच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात कायमच असायचे. आपल्या गाण्याची झलक ते त्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत. हे चॅनल चाहते मोठ्या प्रमाणात फाॅलो देखील करत.
एका मुलाखतीवेळी पंकज उधास यांनी एक मोठा किस्सा सांगितला होता. थेट त्याच्यावर बंदूक रोखण्यात आली होती. पंकज उधास म्हणाले होते की, एका लॉन्ग कॉन्सर्टमध्ये एक व्यक्ती माझ्याकडे आली. त्याने मला फलां-फलां गझल म्हणण्यास सांगितले. त्यावेळी मी त्या व्यक्तीला थेट म्हणालो की, मी तुझा गुलाम नाहीये, जे तू सांगितले ते गायला.
पंकज उधास म्हणाले, मुळात त्या व्यक्तीचा व्यवहार हा अजिबातच चांगला नव्हता. मी त्याला त्याने सांगितलेली गझल म्हणण्यास नकार दिल्यावर त्याने थेट त्याच्या खिशात हात घातला आणि थेट बंदूक काढली. त्यानंतर त्याने ती बंदूक माझ्या डोक्यावर लावली आणि गझल म्हणण्यास सांगितले. तो माझ्यासमोर बंदूक रोखली उभाच राहिला.
इच्छा नसताना देखील मला गझल म्हणावी लागली. या प्रकारावेळी स्वत: ला खूप जास्त मजबूर समज होतो. या प्रकारानंतर मी थेट घरी गेलो. हा किस्सा सांगताना पंकज उधास हे म्हणाले की, हा किस्सा 20 ते 25 वर्षे जुना आहे. कोणाला तरी विश्वास बसेल का की, इतक्या मोठ्या कलाकारासोबत असा हैराण करणारा प्रकार घडू शकतो. मात्र, याबद्दल स्वत: पंकज उधास यांनी सांगितले होते.