मुंबई : प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांनी वयाच्या 72 व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून पंकज उधास यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. पंकज उधास यांनी ना कजरे की धार ना मोतियों के हार, चांदी जैसा रंग है तेरा, रिश्ता तेरा मेरा, आदमी खिलौना है… असे काही गाणे दिली आहेत. पंकज उधास यांचे बालपण हे राजकोट जवळच्या चरखडी गावात गेले. लहान वयातच त्यांनी गाण्याला सुरूवात केली. पंकज उधास हे तीन भावांमध्ये सर्वात लहान होते. त्यांच्या भावांसारखेच ते संगीताच्या दुनियेत बादशाह ठरले.
पंकज उधास हे प्रसिद्धीपासून दूर असले तरीही ते आज कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. हेच नाही तर त्यांना आपल्या करिअरमध्ये पहिले बक्षिस हे लहानपणी 51 रूपये मिळाले. 51 रूपयांपासून सुरूवात आणि थेट आता कोट्यवधी रूपयांचे ते मालक पंकज उधास हे होते. पंकज उधास यांनी नक्कीच एक मोठा काळ गाजवला आहे. विशेष म्हणजे पंकज उधास यांचा चाहता वर्गही खूप जास्त मोठा आहे.
पंकज उधास यांनी तेरा नाम लिया, तू मेरा हीरो, जान ओ मेरी जान, हम तुम्हें चाहते हैं, दे दारू या सुपरहिट गाण्यांना आपला आवाज दिलाय. अवघ्या 7 वर्षांपासून पंकज उधास यांनी गाण्यास सुरूवात केली. पंकज उधास यांचे वडील हे सरकारी कर्मचारी होते. गजलच्या दुनियेतील बादशाह म्हणून पंकज उधास यांना ओळखले जाते.
पंकज उधास हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक होते. पंकज उधास यांच्याकडे 24 ते 25 कोटी संपत्ती आहे. ते तब्बल 25 कोटी संपत्तीचे मालक होते. विशेष म्हणजे पंकज उधास यांचे एक यूट्यूब चॅनल देखील होते, या चॅनलच्या माध्यमातून ते मोठी कमाई देखील करत होते. हजारोंच्या घरात सब्सक्राइबर्स पंकज उधास यांच्या चॅनलचे आहेत.
हेच नाही तर पंकज उधास हे त्यांच्या लाईव्ह गाण्याची झलक त्यांच्या चॅनलवर कायमच दाखवत. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पंकज उधास हे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असत. पंकज उधास हे कायमच आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवताना दिसतात. त्यांना कुटुंबासोबत वेळ घालवायला कायचम आवडत.