‘घोरेर बायोस्कोप अवॉर्ड 2024’च्या विजेत्यांची घोषणा नुकतीच झाली आहे. टीव्ही 9 बांग्लाद्वारे आयोजित या अवॉर्ड शोमध्ये वेगवेगळ्या श्रेणींमध्ये कलाकारांना सन्मानित करण्यात आलं होतं. या यादीत 2024 या वर्षात आपल्या दमदार कामगिरीने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या दिग्दर्शकांचाही समावेश होता. या पुरस्कार सोहळ्यात कोणत्या दिग्दर्शकाने बाजी मारली आणि दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना कोणत्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला, त्याविषयी जाणून घेऊयात..
यावर्षी सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन हॉरर बायोस्कोप पुरस्कारासाठी पाच वेगवेगळ्या नॉन-फिक्शन शोच्या नावांची जोरदार चर्चा होती. स्पर्धकांना दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन देण्यात आलं होतं. यात सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन शो आणि सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन शो- दिग्दर्शक यांसारख्या श्रेणींचा समावेश होता. 2024 मध्ये कोणता शो सर्वोत्कृष्ट ठरला आणि कोणत्या दिग्दर्शकाला हा पुरस्कार देण्यात आला, याची माहिती समोर आली आहे.
या दोन्ही श्रेणींमधील विजेत्यांबद्दल बोलायचं झालं तर ‘डान्स बांग्ला डान्स’ने सर्वोत्कृष्ट नॉन-फिक्शन शोचा पुरस्कार जिंकला आहे. बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्तीसुद्धा या शोशी जोडले गेले आहेत आणि परीक्षक म्हणून ते या शोमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यांच्या या शोला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आपल्या नावे केला आहे. या पुरस्काराशिवाय सर्वोत्कृष्ट नॉन फिक्शन शोच्या दिग्दर्शकाचाही पुरस्कार जाहीर झाला आहे. यावेळी हा पुरस्कार अभिजीत सेन यांनी पटकावला आहे
अभिनेते मिथुन चक्रवर्तींबद्दल बोलायचं झालं तर ते एक इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते आहेत. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलंय. मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आता त्यांच्या लोकप्रिय बंगाली शोलाही सन्मानित करण्यात आलं आहे.