मुंबई | 23 डिसेंबर 2023 : अभिनेता सलमान खान बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानस इंडस्ड्रीवर राज्य करत आहे. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत सलमान खान याने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण सलमान फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. आता देखील सलमान खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सलमान खान याच्या हातात ग्लास दिसत आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर सलमान खान याची चर्चा रंगली आहे.
नुकताच एका सोशल मीडिया युजरने सलमान खान याचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. कारमधून बाहेर पडताना अभिनेता निळा स्वेटशर्ट आणि डेनिम जीन्समध्ये होता. भाईजानची एक झलक पाहाण्यासाठी चाहते आणि पापाराझींनी मोठी गर्दी केली. मात्र, सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे सलमान खिशात असलेल्या ड्रिंक ग्लासने.
Glass in pants pocket😁 new style of bhai #SalmanKhan @BeingSalmanKhan pic.twitter.com/tpjFL5JlBD
— Devil V!SHAL (@VishalRC007) September 3, 2022
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तेव्हा पापाराझींनी पोज न देता आणि चाहत्यांना न भेटता अभिनेता थेट हॉटेलमध्ये निघून गेला. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ एक वर्ष जुना असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. व्हायरल व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
व्हिडीओ व्हायरल होताच, चाहते कमेंट करत सलमान खान याला ट्रोल करत आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘लोकं क्वॉर्टर बाटली अशी घेऊन जातात…’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘जर दारू पिताना तुम्हाला हात मोकळे हवे असतील तर… हा उत्तम पर्याय आहे..’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘भाई पूर्ण नशेत होता. त्याला वाटलं असेल की, खीश्यात ग्लास लपवू शकतो…’
सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेता कायम सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतो. फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील भाईजानच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एवढंच नाही तर, चाहते आजही अभिनेत्याच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.