‘गोलमाल’ फेम अभिनेत्याचं निधन; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

| Updated on: Jul 03, 2023 | 10:43 AM

'गोलमाल' अभिनेत्याच्या निधनामुळे बॉलिवूडला मोठा धक्का, तर कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर... सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या निधनाची चर्चा.. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी वाहिली श्रद्धांजली..

गोलमाल फेम अभिनेत्याचं निधन; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
Follow us on

मुंबई | बॉलिवूड विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ‘गोलमाल’ फेम अभिनेत्याचं निधन झाल्यामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली असून, अभिनेत्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेते हरीश मागोन यांचं निधन झालं आहे. हरीश मागोन यांनी ‘गोलमाल’, ‘चुपके – चुपके’, ‘इनकार’, ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘शेहंशाह’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण अभिनेत्याच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. हरीश मागोन यांच्या निधनाची माहिती सिने ऍन्ड टीव्ही आर्टिस्ट एसोसिएशन सिंटा द्वारे ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली. हरीश यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

हरीश मागोन यांनी एफटीआयआय इंस्टिट्यूटमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांनी ‘चुपके चुपके’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्यांची स्वतःची ऍक्टिंग स्कूल देखील होती. त्यांच्या ऍक्टिंग स्कूलचं नाव हरीश मागोन ऍक्टिंग स्कूल असं आहे. मुंबईतील जुहू याठिकाणी त्यांची ऍक्टिंग स्कूल आहे..

हरीश मागोन यांच्या निधनानंतर अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्यामध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. हरीश मागोन यांच्या निधनानंतर बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं असं म्हणायला हरकत नाही. शिवाय बॉक्स ऑफिस देखील त्यांच्या सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळाला. हरीश मागोन यांनी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर केली आहे…

हरीश मागोन यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हरीश मागोन यांच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी आहे. पण हरीश मागोल सर्वांना सोडून गेल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिवाय बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत हरीश यांचे मैत्रीचे संबंध होतं. पण हरीश यांनी अर्ध्यात साथ सोडल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.