Govinda | 1000 कोटींचा पाँझी घोटाळा; मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या! गोविंदा याचे काय होणार?; बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण

| Updated on: Sep 16, 2023 | 8:11 AM

Govinda | तब्बल १००० कोटींच्या ऑनलाइन घोटाळ्यात गोविंदा याचं नाव... घोटाळ्यातील मुख्य आरोपीच्या अटकेनंतर, अभिनेत्यासोबत काय होणार? अभिनेत्याला नक्की कोणते प्रश्न विचारले जाणार... अभिनेत्याची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर काय होणार... सध्या सर्वत्र चर्चांना उधाण...

Govinda | 1000 कोटींचा पाँझी घोटाळा;  मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या! गोविंदा याचे काय होणार?; बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण
Follow us on

मुंबई : 16 सप्टेंबर 2023 | अभिनेता गोविंदा यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे गोविंदा सध्या 1000 कोटींचा पाँझी घोटाळ्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे चाहत्यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ओडिशाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून पाँझी घोटाळ्याप्रकरणी गोविंदाची चौकशी होवू शकते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेत्याला समन्स जारी केले जाऊ शकतं. एवढंच नाही तर, समन्स जारी करण्यात आल्यानंतर अभिनेत्याला चौकशीसाठी ओडिशात बोलावले जाऊ शकतं. आता गोविंदा याला काय विचारलं जावू शकतं याबद्दल देखील अनेक चर्चे रंगत आहेत. सांगायचं झालं तर, गोविंदा याने 1000 कोटींचा पाँझी घोटाळा करणाऱ्या कंपनीच्या काही प्रमोशनल व्हिडीओंचा प्रचार केला होता.

1000 कोटींचा पाँझी घोटाळ्यातील मुख्य आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सोलर टेक्नो अलायन्स अनेक देशांमध्ये क्रिप्टो गुंतवणुकीच्या बहाण्याने ऑनलाइन पाँझी योजना चालवत होती. आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोक या घोटाळ्याला बळी पडल्याची देखील माहिती समोर येत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

1000 कोटींचा पाँझी घोटाळ्यात एकूण 2 लाखांहून अधिक लोकांची 1000 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता गोविंदाची चौकशी करण्यात येणार आहे. घोटाळ्यात अभिनेत्याचं देखील नाव समोर आल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे….

TV9 कडे EOW ओडिशातील गोविंदाचा व्हिडिओ आणि कागदपत्रे

‘TV9 भारतवर्ष’कडे गोविंदा याचा एक व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये गोव्याला जाण्यापूर्वी गोविंदा खूप उत्साहित आणि आनंदी दिसत आहे. संबंधित व्हिडीओ प्रमोशनसाठी जाण्यापूर्वीचा आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे आयजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आर्थिक गुन्हे शाखेचं पथक लवकरच अभिनेत्याची चौकशी करु शकते.’ जुलैमध्ये गोव्यात आयोजित STA च्या भव्य समारंभाला उपस्थित राहण्याचा अभिनेत्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. एका व्हिडीओमध्ये गोविंदा स्टेजवर डान्स करताना दिसत आहे.

गोविंदा याच्यावर FIR दाखल नाही

गोविंदाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. पण अभिनेत्याला चौकशीला सामोरं जावं लागणार असल्याची चर्चा देखील जोर धरत आहे. अभिनेत्याच्या चौकशीनंतर त्याची भूमिका स्पष्ट होईल. या प्रकरणात गोविंदा केवळ प्रसिद्धीपुरता मर्यादित असेल, तर आर्थिक गुन्हे शाखेकडून अभिनेत्याला साक्षीदार म्हणून उभं राहावं लागेल… अशी माहिती देखील समोर येत आहे.

प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

ओडिशाच्या आर्थिक गुन्हे शाखेने एसटीए क्रिप्टो टोकनच्या प्रमुख 40 वर्षीय गुरतेज सिंग सिद्धू याला श्रीगंगानगर राजस्थान येथून अटक केली आहे. तो पंजाबमधील फरीदकोटचा रहिवासी आहे. आरोपी सतत स्वतःचं ठिकाण बदलत होता. गोवा, लोणावळा, मुंबई, दिल्ली, फरीदकोट, भटिंडा, हनुमानगड आणि श्रीगंगानगर या ठिकाणी जात होता. अखेर त्याला श्रीनगर येथून अटक करण्यात आली आहे.