अभिनेता गोविंदा याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. 90 च्या दशकात गोविंदा यांने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. 90 च्या दशकातील एक काळ असा होता जेव्हा चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त अभिनेत्याची क्रेझ होती. अभिनेत्याचं अभिनय आणि डान्सवर असंख्य चाहते फिदा होते. आजही गोविंदाच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. सांगायचं झालं तर, गोविंदा फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत राहिला. आता रॉयल आयुष्य जगणाऱ्या गोविंदाने अनेक संकटांचा सामना केला आहे.
अनेक मुलाखतींमध्ये गोविंदाने स्वतःच्या आईबद्दल सांगितलं आहे. गोविंदा कायम आईवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतो. अभिनेत्याच्या आईबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. गोविंदाच्या आईचा जन्म एका मुस्लीम कुटुंबात झाला होता. पण लग्नानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. गोविंदा याच्या आईचं नाव निर्मला देवी असं होतं. आयुष्यातील काही शेवटचे दिवस त्यांनी साध्वी म्हणून घालवले.
रिपोर्टनुसार, गोविंदा यांच्या आईचा जन्म वारानसी येथील एका मुस्लीम कुटुंबात झाला होता. त्यांचं लग्नापूर्वीचं नाव नाझिम असं होतं. निर्माते अरुण कुमार यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि स्वतःचं नाव बदललं. गोविंदा 4 भावंडं आहेत. कामिनी, कृती कुमार, पुष्पा आनंद आणि गोविंदा यांच्यासाठी आयुष्य फार खडतर होतं.
गोविंदा यांच्या जन्मानंतर अभिनेत्याच्या आईने संन्यास घेतला. निर्मला देवी यांनी चा मुलांच्या जन्मानंतर संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. 3 जुलै 1998 मध्ये गोविंदाच्या आईने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 81 व्या वर्षी निर्मला देवी यांनी जगाचा निरोप घेतला. गोविंदाच्या आईचं निधन मुंबईत झालं.
सांगायचं झालं तर, गोविंदाने काही मुलाखतींमध्ये त्याच्या आईचा उल्लेख केला आहे. गोविंदाची पत्नी सुनितानेही अनेकदा सांगितलं की त्याचं आईवर खूप प्रेम होतं. आईच्या निधनानंतर ते कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी जाताना त्यांच्या फोटोचं दर्शन घेऊनच बाहेर पडतात.
1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तन बदन’ या सिनेमातून गोविंदा याने फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘हत्या’, ‘स्वर्ग’, ‘आग’, ‘साजन चले ससुराल’, ‘हिरो नंबर 1’, ‘कुली नंबर 1’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. आजही अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही.