मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : आई आणि मुलाचं नातं फार खास असतं… ही गोष्ट प्रत्येकाला माहिती आहे. बॉलिवूडमध्ये देखील असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे कायम त्यांच्या आईबद्दल बोलत असतात. अशाच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता गोविंदा. गोविंदा याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. गेल्या काही दिवसांपासून गोविंदा बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेता त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. गोविंदा याने मुलाखतीत आईसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितलं होतं.
बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करण्यासाठी अभिनेता गोविंदा याने अनेक गोष्टींचा सामना केला. फक्त प्रोफेशनल आयुष्यातच नाही तर, खासगी आयुष्यात देखील गोविंदाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. गोविंदाने एकदा सांगितलं होतं की, अभिनेत्याच्या जन्मानंतर वडिलांनी गोविंदाला स्वीकारण्यास नकार दिला होता.
एका मुलाखतीत गोविंदा म्हणाले होता की, ‘मझ्या वडिलांना असं वाटत होतं आई माझ्यामुळे त्यांच्यापासून विभक्त होत आहे आणि तिने साध्वी होण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांनंतर जेव्हा लोकांनी आईला सांगितलं मुलगा खुपच छान आहे. तेव्हा माझ्यावर त्यांनी प्रेम केलं…’ गोविंदा स्वतःच्या आईवर प्रचंड प्रेम करतो.
गोविंदा आईला एखाद्या देवीप्रमाणे पुजतो. आईचे पाय धुवून पित असल्याचं देखील अभिनेत्याने अनेकदा सांगितलं. गोविंदा आज बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेता आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्यामुळे खंत व्यक्त केली. गोविंदा याने अभिनेता सलमान खान आणि अभिनेता शाहरुख खान याच्यावर देखील निशाणा साधला होता.
गोविंदा याने ‘राजा बाबू’, ‘हीरो नंबर 1’, ‘आंटी नंबर 1’, ‘आंखें’, ‘हद कर दी आपने’, ‘नसीब’, ‘कूली नंबर 1’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.. एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र गोविंदाची क्रेझ होती. गोविंदाच्या प्रत्येक सिनेमाने चाहत्यांने भरभरुन मनोरंजन केलं.
बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत गोविंदाने स्क्रिन शेअर केली आहे. आज देखील गोविंदा कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. शिवाय गोविंदाच्या चाहत्यांची संख्या देखील कमी झालेली नाही. सोशल मीडियावर देखील गोविंदा याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.