Grammy Awards 2024 मध्ये भारताचा डंका; शंकर महादेवन, झाकीर हुसैन यांना पुरस्कार

| Updated on: Feb 05, 2024 | 11:52 AM

प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारताचा डंका वाजला आहे. शंकर महादेवन आणि झाकीर हुसैन यांच्यासह चार जणांनी हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. शक्ती बँडच्या 'दिस मोमेंट' हा पुरस्कार मिळाला आहे. या विजयानंतर भारतीयांची मान उंचावली आहे.

Grammy Awards 2024 मध्ये भारताचा डंका; शंकर महादेवन, झाकीर हुसैन यांना पुरस्कार
Grammy Awards 2024 मध्ये भारताचा डंका
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 5 फेब्रुवारी 2024 | आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित ‘ग्रॅमी पुरस्कार’ सोहळ्यात भारताचा डंका वाजला आहे. तबलावादक झाकीर हुसैन यांच्यासह गायक-संगीतकार शंकर महादेवन यांच्या ‘शक्ती’ या फ्युजन बँडनेही पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम विभागात त्यांनी पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात भारताची मान उंचावली गेली आहे. ग्लोबल म्युझिक अल्बम आणि ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स या दोन्ही विभागात भारतीय कलाकारांनी बाजी मारली आहे. या विजयानंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

संगीत क्षेत्रातील जगभरातील सर्वांत मोठ्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला रविवारी रात्री 8.30 (भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी 6.30) वाजल्यापासून सुरुवात झाली. जॉन मॅकलॉघलिन, झाकिर हुसैन, शंकर महादेवन, वी. सेल्वागणेश आणि गणेश राजगोपालन यांनी एकत्र मिळून बनवलेल्या ‘शक्ती’ बँडच्या ‘दिस मोमेंट’ला ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील या नामवंत कलाकारांना हा पुरस्कार स्वीकारताना पाहून भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. शंकर महादेवन आणि झाकीर हुसैन यांच्यासह देशातील चार संगीतकारांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. उस्ताद झाकीर हुसैन यांनी बासुरीवादक राकेश चौरसिया यांच्यासोबत मिळून दुसरा ग्रॅमी पुरस्कार आपल्या नावे केला आहे.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गाण्याचाही बोलबोला पहायला मिळाला. ग्लोबल साँग कॅटेगरीमध्ये मोदींनी लिहिलेल्या ‘एबंडन्स इन मिलेट्स’लाही जागा मिळाली आहे. मोदींनी गायिका फाल्गुनी शाह आणि गौरव शाह यांच्यासोबत मिळून हे गाणं लिहिलं होतं.

ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांची यादी-

अल्बम ऑफ द इअर- टेलर स्विफ्ट (मिटनाइट्स)
रेकॉर्ड ऑफ द इअर- मायली सायरस (फ्लॉवर्स)
बेस्ट न्यू आर्टिस्ट- व्हिक्टोरिया मॉनेट
साँग ऑफ द इअर- बिली इलिश (बार्बी चित्रपटातील व्हॉट वॉस आय मेड फॉर?)
बेस्ट पॉप वोकल अल्बम- टेलर स्विफ्ट (मिडनाइट्स)
बेस्ट आर अँड बी साँग- SZA (स्नूझ)
बेस्ट कंट्री अल्बम- लेनी विल्सन (बेल बॉटम कंट्री)
बेस्ट म्युझिका अर्बाना अल्बम- कॅरोल जी (मनाना सेरा बोनिटो)
बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स- मायली सायरस (फ्लॉवर्स)
बेस्ट प्रोग्रेसिव्ह आर अँड बी अल्बम- SZA (SOS)
बेस्ट आर अँड बी परफॉर्मन्स- कोको जोन्स (ICU)
बेस्ट फोक- जोनी मिचेल (जोनी मिचेल अॅट न्यूपोर्ट, लाइव्ह)
प्रोड्युसर ऑफ द इअर, नॉन क्लासिकल- जॅक अँटोनॉफ
साँग रायटर ऑफ द इअर, नॉन क्लासिकल- थेरॉन थॉमस
बेस्ट पॉप (डुओ/ग्रुप परफॉर्मन्स)- SZA (घोस्ट इन द मशिन)
बेस्ट डान्स/ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग- स्क्रीलेक्स (फ्रेड अगेन अँड फ्लोडॅन- रंबल)
बेस्ट पॉप डान्स रेकॉर्डिंग- कायली मिनोग (पॅडम पॅडम)
बेस्ट डान्स/ इलेक्ट्रॉनिक म्युझिक अल्बम- फ्रेड अगेन (अॅक्चुअल लाइफ 3)
बेस्ट ट्रेडिशनल आर अँड बी परफॉर्मन्स- पीजे मॉर्टॉन (गुड मॉर्निंग)
बेस्ट आर अँड बी अल्बम- व्हिक्टोरिया मॉनेट (जॅग्वॉर 2)
बेस्ट रॅप परफॉर्मन्स- किलर माईक (सायन्टिस्ट अँड इंजीनिअर्स)
बेस्ट रॅप साँग- किलर माइक (सायन्टिस्ट अँड इंजीनिअर्स)
बेस्ट रॅप अल्बम- किलर माइक (मिशेल)
बेस्ट कंट्री सोलो परफॉर्मन्स- ख्रिस स्टॅप्लेटॉन (व्हाइट हॉर्स)
बेस्ट कंट्री साँग- ख्रिस स्टॅप्लेटॉन (व्हाइट हॉर्स)
बेस्ट ग्लोबल म्युझिक अल्बम- शक्ती (दिस मोमेंट)