Grammy Nominations 2024 : पंतप्रधान मोदींच्या गाण्याला मिळालं ग्रॅमी अवॉर्ड्ससाठी नामांकन

| Updated on: Nov 11, 2023 | 12:23 PM

Grammy Nominations 2024 : पंतप्रधान मोदी यांनी लिहिलेल्या गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळालं आहे. इतिहासात पहिल्यांदा कोणा नेत्याने लिहिलेल्या गाण्याला ग्रॉमी अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळालं आहे.

Grammy Nominations 2024 : पंतप्रधान मोदींच्या गाण्याला मिळालं ग्रॅमी अवॉर्ड्ससाठी नामांकन
PM modi
Follow us on

मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या गाण्याला ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांच्या ‘अबंडन्स इन मिलेट्स’ या गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळालं आहे. ग्रॅमी अवॉर्ड मानाच्या पुरस्कारांपैकी एक मानला जातो. इतिहासात पहिल्यांदा कोणा नेत्याने लिहिलेल्या गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळालं आहे. म्हणून भारतात सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. पंतप्रधान मोदींनी हे गाणं फाल्गुनी शाह आणि गौरव शाह या गायकांना सोबत घेऊन लिहिले आहे.

‘अबंडन्स इन मिलेट्स’ हे गाणं बाजरी म्हणजेच बाजरीची लागवड आणि धान्य म्हणून त्याची उपयुक्तता यावर आधारित आहे. 2024 हे वर्ष ‘इंटरनॅशनल ईयर ऑफ मिलेट्स’ म्हणून साजरं केलं जाणार आहे. म्हणून नरेंद्र मोदी यांनी गायिका फाल्गुनी शाह आणि गौरव शाह यांच्यासोबत एक गाणे लिहिलं. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या गाण्याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

ग्रॅमी 2024 च्या नामांकन यादीत एकूण सात गाण्यांना ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ श्रेणीत नामांकन मिळालं असल्याची माहिती मिळत आहे. ‘शॅडो फोर्सस’साठी अरुज आफताब, विजय अय्यर आणि शेहजाद इस्माइली, ‘अलोन’साठी बर्ना बॉय, ‘फील’साठी डेव्हिडो, ‘मिलाग्रो वाई डिझास्टर’साठी सिल्वाना एस्ट्राडा, बेला फ्लेक, एडगर मेयर आणि झाकीर हुसेन फूट शिवाय, ‘पश्तो’ साठी राकेश चौरसिया यांना नामांकन मिळालं आहे.

‘अबंडन्स इन मिलेट्स’ गाण्याच्या गायिका फाल्गुनी शाह यांचं ट्विट

वर्षाच्या सुरुवातील ट्विटरवर गाणं शेअर करत फाल्गुनी शाह म्हणाल्या, ‘आमचं गाणं ‘अबंडन्स इन मिलेट्स’चा व्हिडीओ समोर आला आहे. शेतकऱ्यांना बाजरी पिकवण्यासाठी आणि जगाची भूक दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक गाणं लिहिलं आणि तयार केलं आहे. @UN ने हे वर्ष बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलं आहे.’

सोशल मीडियावर सध्या ‘अबंडन्स इन मिलेट्स’ गाण्याची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील गाण प्रचंड आवडलं आहे. आता गाणं ग्रॅमी अवॉर्ड्सपर्यंत पोहोचलं आहे. ‘अबंडन्स इन मिलेट्स’ गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्स नामांकन मिळाल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे.