‘बिग बॉस ’च्या 18 व्या पर्वामुळे प्रसिद्धी झोतात आलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते तसे अनेक विषयांमुळे चर्चेत असतात. कधी ‘बिग बॉस’, कधी शरद पवार अन् उद्धव ठाकरेंवर केलेल्या वक्तव्यामुळे, तर कधी एसटी बँकेमध्ये गैरव्यवहारबद्दलची चौकशी असेल. अशा बऱ्याच कारणांमुळे ते फेमस आहेत.
गुणरत्न सदावर्ते लवकरच चित्रपटात
गुणरत्न सदावर्ते त्यांच्या बोलण्याच्या आणि आवजाच्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. त्यांचा ‘डंके की चोट पे’ हा डायलॉग तर अगदी सर्वत्र प्रसिद्ध झालेला आहे. तसेच सदावर्ते कधी कोणत्या विषयामुळे चर्चेत येतील हे काही सांगता येत नाही. कारण प्रत्येक वेळी ते असे काही स्टेंटमेंट देतात की ते व्हायरल होतं आणि त्याची बातमी होते. आताही सदावर्ते अशाच एका विषयावर बोलले आहेत ज्याबद्दल सर्वत्र चर्चा आहे. ती म्हणजे सदावर्ते हे लवकरच चित्रपटात झळकणार आहेत.
निर्माते-दिग्दर्शकांसोबत बोलणं झाल्यचं सांगितलं
गुणरत्न सदावर्ते यांनी टिव्ही ९ मराठीशी बोलताना याबद्दल खुलासा केला आहे. सदावर्तेंनी भाजप सरकार, एसटी बँकेमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोप अशा अनेक विषयांवर बोलल्यानंतर त्यांनी थेट स्वत:च्या चित्रपटाची घोषणा केली. ते म्हणाले की, “बिग बॉस नंतर जगभरामध्ये माझी ख्याती निर्माण झाली आहे. माझी एक वेगळीच ओळख तयार झाली. मी रुपेरी परद्यावर सुद्धा येणार आहे.
निर्माते-दिग्दर्शकांसोबत माझं बोलणं सुरू आहे. त्यामुळे लवकरच मी चित्रपटात दिसेल” असा खुलासा त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जनतेला ख्रिसमसच्याही भरभरून शुभेच्छा दिल्या.
गुणरत्न सदावर्तेंबद्दल अजून काही…
गुणरत्न सदावर्ते यांचे वडील पेशाने पोलिस होते आणि स्वत: गुणरत्न सदावर्ते पेशाने वकील आहेत. गुणरत्न सदावर्ते यांचे कॉलेजच्या दिवसांमध्ये त्यांची प्रेयसी जयश्रीसोबत लग्न झाले. जयश्री ह्या पेशाने डॉक्टर असून त्यांना कायद्याबद्दल प्रचंड आवड आहे, त्यामुळे ते अनेकदा दोघेही एकत्र दिसत असतात. गुणरत्न आणि त्यांची पत्नी दोघेही करिअरच्या दृष्टीने वचनबद्ध आहेत. अनेकदा सदावर्ते कपलचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असतात. गुणरत्न आणि जयश्री यांना एक मुलगी आहे, जिचं नाव झेन आहे.