बीड आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यात सुरु असलेल्या वादात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. “सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य चुकीच आहे. अश्लील भावनेप्रमाणे त्यांचं वर्तन आहे” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. “सुरेश धस यांनी कलावंत जगाचा अपमान केला आहे. सभापती यांनी याची दखल घ्यावी. आमदार सुरेश धस यांना बडतर्फ केलं पाहिजे” अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली. ‘सुरेश धस हेच इव्हेंट करतात, त्यांच्या मोर्चात वंजारी समाज नाही’ असं गुणरत्न सदावर्ते टीका करताना म्हणाले.
“धनंजय मुंडे आणि पोलीस यांच्यावर दबाव आणण्याचं काम सुरेश धस करत आहेत” असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला. “कायद्याने न्यान द्या. कोणालाही आरोपी करा असे नाही. तपास व्यवस्थित सुरू आहे” असं सदावर्ते म्हणाले. “पावशेर जरांगे देखील तिथे जात आहे. त्यांना अभ्यास नाही. संजय राऊत यांची मुंडेंबाबत नाव घेण्याची हिंमत नाही. हा दबाव मोर्चा आहे” अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली.
अंजली दमानिया यांनाच मॅसेज कसा येतो?
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरही गुणरत्न सदावर्ते यांनी आरोप केले. “अंजली दमानिया कोणाच्या म्होरक्या म्हणून काम करत आहेत का? त्यांनाच कसा मॅसेज येतो?. अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या नाहीत, खरे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आहेत” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. “अंजली दमानिया यांच्या ठिया आंदोलनात पाच कार्यकर्ते नसतील. धनंजय मुंडे यांच्यासाठी संविधान क्रांती मोर्चा निघणार” असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.
प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद
या सगळ्या प्रकरणात प्राजक्ता माळी यांचं नाव आल्याने आज संध्याकाळी त्या पत्रकार परिषद घेऊ शकतात. प्राजक्ता माळी राज्य महिला आयोगाकडेही आमदार सुरेश धस यांच्याविरोधात तक्रार करणार अशी सूत्रांची माहिती आहे. प्राजक्ता माळी यांच्या पत्रकार परिषदेमुळे सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चा थांबू शकतात. त्याशिवाय काही आरोपांना त्या उत्तरही देतील.