तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग हा तब्बल 25 दिवस बेपत्ता होता. गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाल्यानंतर त्याचे पालक आणि चाहते चिंतेत होते. तारक मेहता का उल्टा चश्माच्या टीमने देखील गुरुचरण सिंगसाठी प्रार्थना केली. मुंबईला जातो म्हणून गुरुचरण सिंग हा घरातून निघाला आणि तो मुंबईला आलाच नाही. त्यानंतर 25 दिवसांनंतर तो घरी परतला आणि त्याने सांगितले की, त्याला वापस यायचेच नव्हते. परंतू आई वडिलांमुळे तो परत आला. 25 दिवसांमध्ये आपण कुठे होतो, याचीही सविस्तर माहिती त्याने पोलिसांना दिली.
गुरुचरण सिंग हा आर्थिक तंगीत असल्याचे सांगितले जात होते. तारक मेहता का उल्टा चश्मा हा शो त्याने 2020 मध्येच काही खासगी कारणांमुळे सोडला. आता गुरुचरण सिंग याच्याकडे काही काम नाहीये. तारक मेहता मालिका सोडल्यानंतर त्याने अनेक व्यवसाय केले. मात्र, त्याला कशातच यश मिळाले नाही.
आता नुकताच गुरुचरण सिंग हा तारक मेहता मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांना भेटण्यासाठी आला. यामुळेच गुरुचरण सिंग हा परत तारक मेहता मालिकेत परतणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. यावर बोलताना गुरुचरण सिंग म्हणाला की, मला माहिती नाही की, पुढे काय होणार बघू काय काय होते ते…
सोढीसोबतच्या भेटीवर असित कुमार मोदी हे म्हणाले की, सोढी माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे. खूप वर्ष तो आमच्यासोबत जोडला गेला होता. सोढीने काही खासगी गोष्टींमुळे शो सोडला होता. जेंव्हाही तो मुंबईमध्ये येतो, त्यावेळी मला भेटतो. जेंव्हा तो बेपत्ता झाला होता, त्यावेळी मी खूप जास्त टेन्शनमध्ये होतो.
त्यावेळी मी टेन्शनमध्ये त्याला मेसेज देखील केला होता. तो माझ्या ऑफिसमध्ये आला होता. आम्ही काही गोष्टींवर बोललो. मी भविष्यासाठी सोढीला शुभेच्छा देतो. सोढी याने असित कुमार मोदी यांची भेट घेतल्याने आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. सोढी तारक मेहताच्या मालिकेत पुनरागमन करू शकतो.