अभिनेता अजय देवगन याचा आज वाढदिवस आहे. म्हणून सर्वत्र अजय देवगन याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. आज अजय त्याच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे, पण एक काळ असा होता जेव्हा अजय याच्या नावाची चर्चा अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत झाली. एवढंच नाही तर, बॉलिवूडच्या एक प्रसिद्ध अभिनेत्रीने, मी फक्त अजय याच्यामुळे अविवाहित आहे… असं सांगितलं.. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाहीतर, अभिनेत्री तब्बू आहे. तब्बू वयाच्या 52 व्या वर्षी देखील अविवाहित आहे आणि एक कार्यक्रमात अभिनेत्रीने यासाठी अजय याला जबाबदार ठरवलं होतं.
तब्बू हिने विनोदवीर कपिल शर्मा याच्या ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये स्वतःच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला होता. कपिलने तब्बूला विचारलं, ‘तू इतकी सुंदर आहेस, तरी तुझ्या आयुष्यात कोणी आलं कसं नाही. तू लग्न का नाही केलंस?’ यावर तब्बूने दिलेलं उत्तर आजही चर्चेत आहे.
तेव्हा अजय याच्याकडे इशारा करत अभिनेत्री म्हणाली, ‘कॉलेजमध्ये असताना अनेक मुलांनी मला प्रपोज केलं. पण तेव्हा अजय त्यांना नाही सांगून पळवून लावायचा… तुम्ही तिच्या लायकीचे नाहीत असं अजय म्हणायचा. अनेक वर्षे अशीच गेली. त्यामुळे लग्न करण्याचा विचार देखील त्यानंतर कधी केला नाही…’ असं अभिनेत्री म्हणाली.
सांगायचं झालं तर, अजय – तब्बू यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. रिपोर्टनुसार, तब्बू – अजय यांनी काहीही एकमेकांना डेट केलं नाही. दोघे फक्त चांगले मित्र आहेत. आजही तब्बू – अजय यांच्यातील मैत्री कमी झालेली नाही. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तब्बू – अजय यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
अभिनेता तब्बू आणि साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. दोघांनी जवळपास एकमेकांना १० वर्ष डेट केलं. पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. कारण तेव्हा नागार्जुन विवाहित होता. पण जेव्हा दोघांचं ब्रेकअप झालं, तेव्हा त्यांचे मार्ग वेगळे झाले.
बॉलिवूडमध्ये करियर करत असताना अभिनेता अजय देवगन याने अभिनेत्री काजोल हिच्यासोबत लग्न केलं. काजोल आणि अजय यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. काजोल कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. अजय त्याच्या कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगतो.