Bipasha Basu काम न करता कमावते कोट्यवधी रुपये; अभिनेत्रीच्या संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क

| Updated on: Jan 07, 2023 | 12:26 PM

गेल्या अनेक वर्षांपासून बिपाशा बासू बॉलिवूडपासून दूर, तहीही अभिनेत्री कमावते कोट्यवधी रुपये

Bipasha Basu काम न करता कमावते कोट्यवधी रुपये; अभिनेत्रीच्या संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क
Bipasha Basu काम न करता कमावते कोट्यवधी रुपये; अभिनेत्रीच्या संपत्तीचा आकडा जाणून व्हाल थक्क
Follow us on

Happy Birthday Bipasha Basu: अभिनेत्री बिपाशा बासू सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. बिपाशाच्या लेकीचं नाव देवी असं आहे. बिपाशाने १२ नोव्हेंबर २०२२ रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. अभिनेता करण ग्रोवर आणि बिपाशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. एककाळ बॉलिवूडमध्ये अव्वल अभिनेत्रींपैकी एक असणारी बिपाशा गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेनयापासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांसोबत संवाद साधत असते. आता देखील वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर करत बिपाशाने भावना व्यक्त केल्या.

बिपाशाने देवीसोबत एक व्हिडीओ पोस्ट केल्या ज्यामध्ये ती अभिनेत्री लेकीसोबत आनंद साजरा करताना दिसत आहे. लेकीसोबत व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, ‘देवाने मला सर्वात चांगलं गिफ्ट दिलं आहे… माझी मुलगी देवी… त्याआधी माझा पती… मी जगातील सर्वात भाग्यशाली मुलगी आहे…’ सध्या अभिनेत्रीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

 

 

दरम्यान, मातृत्वाचा आनंद घेणारी बिपाशा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली, तरी कोट्यवधींची कमाई करते. मीडिया रिपोर्टनुसार बिपाशाकडे १५ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास १११ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर करण सिंग ग्रोवरची संपत्ती बिपाशापेक्षा कमी आहे. अभिनेत्याकडे २ मिलियन म्हणजे जवळपास १५ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

बिपाशाने वयाच्या १७ व्या वर्षापासून करियरला सुरुवात केली. अभिनेत्री एका सिनेमासाठी तब्बल दोन ते तीन कोटी रुपये मानधन घेते. सध्या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसून खासगी आयुष्याचा आनंद घेत आहे.

बिपाशा आणि करण यांचं लग्न

बिपाशा आणि करण यांच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली. २०१५ साली सिनेमाच्या सेटवर भेट झाल्यानंतर कालांतराने त्यांच्या प्रेमाचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर २०१६ मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर जवळपास ६ वर्षांनंतर दोघे आई-बाबा झाले.

बिपाशा आणि करण यांची पहिली भेट 2015 मध्ये चित्रपटाच्या सेटवर झाली होती. चित्रपटाच्या सेटवर सुरू झालेल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर करण आणि बिपाशाने एप्रिल 2016 मध्ये त्यांच्या रिलेशनशिपला नाव देण्याचा निर्णय घेतला. आता जवळपास 6 वर्षांच्या लग्नानंतर हे जोडपं पालक बनणार आहे.