Imran Khan Birthday: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे अभिनेता आमिर खान याचा भाचा आणि अभिनेता इमरान खान गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असला तरी कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. इमरान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने 2011 मध्ये गर्लफ्रेंड अनंतिका मलिक हिच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर अवंतिका हिने गोंडस मुलीला जन्म दिला. पण मुलीच्या जन्मानंतर देखील दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
लग्नाच्या 8 वर्षानंतर म्हणजे 2019 मध्ये इमरान आणि अवंतिका यांनी अधिकृत घटस्फोटची घोषणा केली. घटस्फोटानंतर अवंतिका हिने काधीच घटस्फोटावर वक्तव्य केलं नाही. पण आता अनेक वर्षानंतर अवंतिका हिने घटस्फोटानंतर खंत व्यक्त केली आहे.
अवंतिका हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एका क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये 2019 हे वर्ष सर्वात कठीण असल्याचं अवंतिका हिने सांगितलं आहे. पोस्टमध्ये अवंतिका हिने घटस्फोटाचा उल्लेख केलेला नाही. पण 2019 हे वर्ष सर्वात कठीण असल्याचं सांगितलं.
2019 मध्ये अवंकिता आणि इमरान यांचे मार्ग वेगळे झाल्यामुळे तिच्यासाठी वर्ष कठीण असेल… असे अनेक तर्क चाहते लावताना दिसत आहेत. पुढे दोन मित्रांचा उल्लेख करत अवंतिका म्हणाली, ‘कठीण काळात माला मित्रांची साथ लाभली. त्यांनी मला अशा वेळी पाहिलं जेव्हा मी कठीण परिस्थितीचा सामना होते.’
‘पण आता मी माझं आयुष्य जगत आहे. आता माझ्या माझ्या चेहऱ्यावर चमक आणि डोळ्यांमध्ये आनंद दिसत आहे… मी कधीच नकारात्मक विचार केला नाही म्हणून आज आनंदी आहे…’ असं देखील अवंतिका म्हणाली. अवंतिका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
इमरान खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर अभिनेत्याच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली आहे. पत्नी अवंतिका मलिकला घटस्फोट दिल्यानंतर त्याच्या आयुष्यात लेखा वॉशिंग्टनची एण्ट्री झाली आहे. लेखा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.