मुंबई : 19 सप्टेंबर 2023 | बॉलिवूडची ‘खल्लास गर्ल’ ईशा कोप्पिकर (Isha Koppikar) हिने एक काळ बॉलिवूडवर राज्य केलं होतं. आता अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. आज ईशा पती टिमी नारंग (Timmy Narang) आणि लेक रियाना (Rianna) यांच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्रीच्या नावाची चर्चा दिवंगत अभिनेता इंदर कुमार (Inder Kumar) याच्यासोबत रंगली होती. इंदर कुमार याने ईशा हिच्यासोबत १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘एक था दिल एक थी धडकन’ सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती.
ईशा हिच्या प्रेमात इंदर सर्व काही विसला होता. ‘वॉन्टेड’ फेम इंदर तीन वेळा विवाहबंधनात अडकला होता. पण तरी देखील अभिनेता ईशा हिला विसरू शकत नव्हता. इंदर याची पहिली पत्नी सोनल (Sonal Kariya) हिने एका मुलाखतीत मोठं वक्तव्य केलं होतं. सोनल हिने घटस्फोटाचं कारण सांगितलं. जेव्हा सोनल गरोदर होती.
सोनल म्हणाली ‘इंदर लग्नानंतर देखील ईशा हिच्या प्रेमात होता. मी गरोदर होते तरी देखील त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. मी त्याला सांगितलं होतं, तू ईशा हिला घरी घेवून ये… तो कधीच ईशा हिला विसरु शकत नव्हता. तेव्हा मी इंदर याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला…’ घटस्फोटानंतर देखील इंदर ईशा हिच्या संपर्कात होता.
इंदर कुमार ड्रग्जच्या अहारी गेला होता. हळूहळू त्याला काम मिळणं देखील बंद झालं होतं.. त्यामुळे अस्वस्थ झाला. पुढे सोनल म्हणली, ‘मी त्याला कळवले की तो एका मुलीचा वडील झाला आहे. त्याने माझ्या मेसेजला प्रतिसाद दिला नाही. त्याला सिनेमात काम मिळत नव्हतं. तो त्याच्या स्वतःच्या विश्वात राहत होता..’ असं देखील अभिनेत्याची पहिली पत्नी म्हणाली.
घटस्फोटानंकर अभिनेत्याने २००९ मध्ये दुसरं लग्न केलं. अभिनेत्याने दुसरं लग्न कमलजीत कौर नावाच्या एका मुलीसोबत केलं. दुसरं लग्न अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्याने तिसरं लग्न पल्लवी श्रॉफ हिच्यासोबत केलं. २०१३ मघ्ये पल्लवी आणि इंदर यांनी दुसरं लग्न केलं. लग्नानंतर पल्लवी हिने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव भावना आहे. पण अभिनेता तिसऱ्या लग्नानंतर जास्त काळ जगू शकला नाही.. २०१७ मध्ये इंदर याने वयाच्या ५० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.