मुंबई : दाक्षिणात्य मनोरंजन विश्वापासून ते बॉलिवूडपर्यंत, आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर खोल छाप सोडणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आणि लेखक मणिरत्नम (Mani Ratnam) आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत. मणिरत्नम यांना ‘सिनेमाचे जादूगार’ म्हटले जाते. खास गोष्ट अशी आहे की, त्यांची कला आणि चित्रपटांसाठीचे परिश्रम नेहमीच पडद्यावर स्पष्ट दिसतात (Happy Birthday Mani Ratnam know about his most famous films).
मणिरत्नम यांचे खरे नाव गोपाळ रत्नम सुब्रमण्यम (Gopala Ratnam Subramaniam) असे आहे. मणिरत्नम यांनी प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट सादर केले आहेत. या कारणामुळे, त्यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत सुमारे सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार फिल्मफेअर पुरस्कार आणि सहा तमिळ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. चला तर, आज या खास दिनी आपण त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांविषयी जाणून घेऊया…
1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रोजा’ (Roja) चित्रपटाला चाहत्यांकडून खूप पसंती मिळाली होती. हा चित्रपट एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट होता. ज्यामध्ये तामिळनाडूमधील एक मुलगी दहशतवाद्यांच्या बंदिवासात अडकलेल्या नवऱ्याला वाचवते. या चित्रपटाला 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले हा चित्रपट हिंदी, मराठी, मल्याळम आणि तेलुगु भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
‘रोजा’ नंतर मणिरत्नम यांनी ‘बॉम्बे’ (Bombay) या चित्रपटातून पुन्हा एकदा सामाजिक विषय चाहत्यांसमोर मांडला. या चित्रपटात एक हिंदू मुलगा आणि एक मुस्लिम मुलीची प्रेमकथा दाखवली गेली. चित्रपटात खऱ्या घटना दाखवल्या गेल्या. चित्रपटात समाजातील वाढता धार्मिक तणाव रंजकपणे सादर करण्यात आला.
1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ (Dil se) या चित्रपटातील गाण्यांपासून, शाहरुख खान आणि मनीषा कोईराला, प्रीती झिंटाच्या अभिनयाने सर्वांना वेड लावले. ‘दिल से’ या रोमँटिक-थ्रिलर चित्रपटाला पडद्यावर कमाईच्या बाबतीत जास्त यश मिळालं नसेल, पण समीक्षकांच्या पातळीवर हा चित्रपट खूपच पसंत केला गेला. चित्रपटात दहशतवाद आणि ईशान्य भागातील तणाव सादर केला गेला (Happy Birthday Mani Ratnam know about his most famous films).
‘साथिया’ (Saathiya) या चित्रपटात राणी मुखर्जी आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात एक प्रेम कथा दाखवण्यात आली होती. पण कुटूंबापासून विभक्त झाल्यानंतर दोन प्रेमी, कसे एकमेकांसोबत आयुष्य घालवतात हे चित्रपटात दाखवण्यात आले होते. या प्रेमकथेने यशाचे झेंडे फडकवले होते. मणिरत्नम यांनी फक्त या चित्रपटाची पटकथा लिहिलेली होती.
पुन्हा एकदा मणिरत्नम यांच्या ‘युवा’ (Yuva) या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये जादू पसरवली. या चित्रपटात राणी मुखर्जी, करीना कपूर खान, ईशा देओल, अजय देवगन, अभिषेक बच्चन आणि विवेक ओबरॉय यांच्या मुख्य भूमिका होत्या. प्रेमकथेबरोबरच राजकीय ताणतणाव आणि समाजातील विचारसरणी चित्रपटात आणल्या गेल्या. हा चित्रपट बर्यापैकी उपदेशात्मक असल्याचे म्हटले जाऊ लागले.
मणिरत्नम यांनी 2007 साली एका व्यावसायिकाची कहाणी मोठ्या पडद्यावर आणली होती, ज्याने सर्वांना प्रेरित केले. हा चित्रपट होता अभिषेक बच्चन स्टारर ‘गुरु’ (Guru). हा चित्रपट धीरूभाई अंबानी यांच्या जीवनावर आधारित होता. पण ज्या पद्धतीने हा चित्रपट सादर करण्यात आला, तो कौतुकास्पद होता. या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या जोडीने बॉक्स ऑफिसवर आपल्या केमिस्ट्रीने जादू केली होती.
(Happy Birthday Mani Ratnam know about his most famous films)
Priya Bapat : स्मायलिंग स्टार…,प्रिया बापटचं मनमोकळं आणि दिलखुलास हास्यhttps://t.co/bbRcDSPWVZ#Priyabapat #MarathiActress
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 1, 2021