Prabhas : परदेशातून प्रभास कमावतो कोट्यवधींची माया; कामाईचं माध्यम जाणून व्हाल हैराण

| Updated on: Oct 23, 2023 | 12:45 PM

Prabhas : प्रभास याच्या कमाईचं माध्यम थक्क करणारं, सिनेमांमधूनच नाही तर, अशाप्रकारे देखील अभिनेता कमावतो कोट्यवधींची माया.. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या संपत्तीची चर्चा... रॉयल आयुष्य जगणाऱ्या प्रभासकडे गडगंड संपत्ती आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन

Prabhas : परदेशातून प्रभास कमावतो कोट्यवधींची माया; कामाईचं माध्यम जाणून व्हाल हैराण
Follow us on

मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : झगमगत्या विश्वातील असंख्य सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे. ज्यामुळे सेलिब्रिटी चर्चेत असतात. अनेकांकडे अनेक महागड्या वस्तू आहेत. सेलिब्रिटी आणि त्यांच्या रॉयल आयुष्याची कायम सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेली असते. सेलिब्रिटी कायम त्यांच्या महागड्या गोष्टींमुळे चर्चेत असतात. आता सध्या अभिनेता प्रभास यांच्या संपत्तीची चर्चा रंगत आहे. अभिनेत्याचा वाढदिवस असल्यामुळे त्याच्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. प्रभास यांच्याकडे देखील गडगंज संपत्ती आहे. अभिनेता फक्त त्यांच्या सिनेमांमुळेच नाही तर, रॉयल आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.

कायम त्याच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असणार अभिनेता प्रभास याची परदेशात देखील गडगंज संपत्ती आहे. इटली या देशात देखील अभिनेत्याची गडगंज संपंत्ती आहे. रिपोर्टनुसार अभिनेत्याचा इटलीमध्ये भव्य व्हिला आहे. अभिनेता परदेशात असलेला व्हिला भाड्याने देत वर्षाला कोट्यवधी रुपये कमावतो. अभिनेता परदेशात असलेला व्हिला भाड्याने देत महिन्याला लाखो रुपये कमावतो.

अभिनेता व्हिला परदेशी पर्यटक आणि स्थानिकांना भाड्याने देतो. अभिनेत्यचा परदेशात असलेला व्हिला भाड्याचं महिन्याचं भाडं जवळपास ४० लाख रुपये आहे. म्हणजे अभिनेता वर्षाला त्याच्या एका व्हिलाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावतो.

हे सुद्धा वाचा

महत्त्वाचं म्हणजे, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अभिनेता कायम मित्रांसोबत परदेशात सुट्ट्यांता आनंद लुटण्यासाठी जातो.. प्रभास टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात.

भारतात देखील अभिनेत्याची गडगंज संपत्ती आहे. हैदराबदमध्ये अभिनेत्याचा भव्य बंगला आहे. हैदराबदमध्ये असलेल्या घरात सर्व सोयी-सुविधा आहेत… एवढंच नाही तर, अभिनेत्याकडून महागड्या गाड्यांचं देखील कलेक्शन आहे. अभिनेत्याकडे Rolls Royce, BMW आणि Jaguar यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.. साउथ सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेता प्रचंड रॉयल आयुष्य जगतो..

प्रभासच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने ‘बाहुबली’, ‘बाहुबली पार्ट २’ यांसरखे सुपरहीट सिनेमे देत चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत अभिनेत्याने स्क्रिन शेअर केली आहे. आता अभिनेता ‘सालार’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात अभिनेता महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे . सध्या चाहते देखील अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.