अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा आज वाढदिवस असल्यामुळे सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे. श्वेता तिवारी हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. श्वेताच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. पण एक काळ असा होता जेव्हा श्वेता खासगी आयुष्यामळे तुफान चर्चेत आहे. एवढंच श्वेता म्हणजे इतरांचा संसार उद्ध्वस्त करणारी महिला… असं म्हणत देखील अभिनेत्रीला लोकं ट्रोल करु लागले.
एका खासदाराच्या पत्नीने देखील अभिनेत्रीवर गंभीर आरोप केले होते. या खासदाराचं नाव मनोज तिवारी असं आहे. मनोज तिवारी फक्त खासदार नाही तर, अभिनेते देखील आहे. श्वेता तिवारी आणि मनोज तिवारी यांनी अनेक भोजपुरी सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या पहिल्या भोजपुरी सिनेमाचं नाव ‘कब अइबू अंगनवा हमार’ असं होतं. सिनेमात अभिनेत्री नयना नावाच्या मुलीची भूमिका बजावला. शिवाय ‘बिग बॉस 14’ मध्ये देखील दोघे एकत्र होते.
सिनेमांमधील आणि बिग बॉसच्या घरातील श्वेता – मनोज यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. पण मनोज तिवारी यांच्या पहिल्या पत्नीला मात्र दोघांचं नातं खटकत होतं. कालांतराने मनोज तिवारी आणि पहिली पत्नी राणी यांचा घटस्फोट झाला पण मनोज तिवरी यांच्यासोबत श्वेताची मैत्री आजही कायम आहे.
एवढंच नाही तर, मनोज तिवारी यांच्या पहिल्या पत्नी श्वेतावर अनेक गंभीर आरोप देखील केले. श्वेता तिवारी हिच्यावर राणी कायम संशय घ्यायच्या. श्वेता तिवारी आणि मनोज तिवारी यांचं अफेअर सुरु आहे… असं राणी यांना कामय वाटायचं. श्वेता – मनोज यांच्या नात्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता. अखेर 2012 मध्ये मनोज तिवारी आणि राणी यांचा घटस्फोट झाला.
श्वेता तिवारी हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री लवकरच ‘सिंघम अगेन’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर श्वेताच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.