हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नात्यामुळे जोरदार चर्चेत दिसत आहेत. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्यामधील वाद वाढला असून यांचा लवकरच घटस्फोट होणार असल्याचे सांगितले जातंय. हेच नाहीतर मागील काही महिन्यांपासून नताशा ही हार्दिक पांड्या याला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये देखील दिसत नाहीये. भारतीय संघाने T20 वर्ल्डकप जिंकला आणि देशभरातून शुभेच्छांचा वर्षावर भारतीय संघावर झाला. मात्र, हार्दिक पांड्या याचा पत्नी नताशा स्टॅनकोविक हिने सोशल मीडियावर एकही पोस्ट शेअर केली नाही. हार्दिक पांड्या याने या सामन्यात धमाकेदार कामगिरी केली.
सतत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. त्यामध्ये आता हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्याबद्दल अत्यंत मोठी माहिती ही पुढे आलीये. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने याबद्दल भाष्य केले आहे आणि अखेर नेमके काय सुरू आहे हे सांगितले आहे.
रिपोर्टनुसार दोघांमध्ये वाद सुरू आहेत आणि दोघांनाही हे वाद मिटवायचे नाहीत. हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, मुळात म्हणजे हार्दिक पांड्या याच्या काही गोष्टींवर नताशा प्रचंड नाराज आहे. हेच नाहीतर तिला आता या नात्यामध्ये राहण्याची काहीच इच्छा राहिली नाहीये. हार्दिक पांड्या याला देखील पॅचअप करण्याची इच्छा नाहीये.
हेच नाहीतर त्याने म्हटले की, कोणालाच माहिती नाहीये की पुढे नेमके काय होणार आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार दोघांमधील वाद मिटण्याची चिन्हे अजिबात दिसत नाहीत. घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे नताशा आणि हार्दिक पांड्या यांनी यावर भाष्य करणे टाळल्याचे बघायला मिळतंय. दोघेही यावर अजिबात बोलत नाहीयेत. हार्दिक पांड्या याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर नताशा स्टॅनकोविक हिने टीव्ही अभिनेता अली गोनी याला डेट केले.
दोघे रिलेशनमध्येही होते. मात्र, अचानक यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर नताशा स्टॅनकोविक हिने हार्दिक पांड्या याला डेट करण्यास सुरूवात केली. नताशा स्टॅनकोविक ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही नताशा दिसते. हेच नाहीतर नताशा अंबानींच्या पार्टीमध्येही हार्दिक पांड्या याच्यासोबत पोहोचली नव्हती. घटस्फोटाची चर्चा असताना सतत नताशा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहे.