Hardik Pandya and Natasha divorce: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री नताशा हिच्यासोबत घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर हार्दिक यांचं नाव अभिनेत्री ब्रिटीश सिंगर जास्मिन वालिया हिच्यासोबत जोडलं जात आहे. शिवाय घटस्फोटानंतर हार्दिक याने जास्मिन हिच्यासोबत सुट्ट्यांचा देखील आनंद लुटला… अशी चर्चा रंगत आहे. समोर आलेल्या काही फोटोंमुळे हार्दिक आणि जास्मिन यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला… फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील झाली. फोटोंध्ये दोघांचं बॅकग्राउंड सारखंच होतं.
एवढंच नाही तर, जास्मिन आणि हार्दिक सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो देखील करतात. शिवाय एकमेकांच्या पोस्टला लाईक देखील करतात. पण अद्याप हार्दिक आणि जास्मिन यांनी यावर अधिकृत वक्तव्य केलं नाही. त्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. एवढंच नाही तर, हार्दिक आणि जास्मिन लवकरच चाहत्यांना ‘गुडन्यूज’ देतील असं देखील सांगण्यात येत आहे.
जास्मिन हिच्याआधी हार्दिक याने अभिनेत्री आणि मॉडेल नताशा हिच्यासोबत लग्न केलं. दोघांना एक चार वर्षांचा मुलगा देखील आहे. पण नात्यात काही अडचणी आल्यानंतर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर नताशा मुलाला घेवून तिच्या मायदेशी गेली आहे. अभिनेत्री पुन्हा भारतात येणार की नाही… याबद्दल अद्याप काहीही कळू शकलेलं नाही.
सांगायचं झालं तर, जास्मिन वालिया आणि नताशा यांच्यामध्ये अधिक श्रीमंत कोण आहे? अशी देखील चर्चा रंगली आहे. तर नताशा श्रीमंतीमध्ये जास्मिनच्या एक पाऊन पुढे आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नताशा हिची नेटवर्थ 20 कोटी रुपये असल्याची माहिती मिळत आहे. नताशा डान्स, जाहिराती आणि मॉडेलिंगच्या माध्यमातून कमाई करते.
हार्दिक पांड्या याची गर्लफ्रेंड जास्मिन वालिया हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीकडे 3 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सिंगिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींच्या माध्यमातून अभिनेत्री कोट्यवधींची कमाई करते. रिपोर्टनुसार, लहानपणापासून जास्मिन सिंगिंग श्रेत्रात सक्रिय आहे. सोशल मीडियावर देखील जास्मिन कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.