गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. घटस्फोटाच्या चर्चा रंगत असताना नताशा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. नताशा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या रोजच्या आयुष्यातील अपडेट चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. नताशा मुलासोबत देखील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील नताशा हिने सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे.
फोटोंमध्ये नताशा बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे. पण नताशा हिने लिहिलेल्या कॅप्शनने चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. फोटोमध्ये नताशा हिने बेबी पिंक रंगाचा टॉप घातला आहे आणि गळ्यात स्कार्फ आहे. अभिनेत्रीवर चश्मा देखील उठून दिसत आहे. अनेकांना नताशा हिचा लूक आवडला आहे.
फोटो पोस्ट करत नताशा हिने कॅप्शनमध्ये, ‘हे जाणून घेण्यास इतकी शांतात आहे की, जे तुमच्यासाठी आहे, ते तुम्ही विसरत तर नाही आहात…’ असं लिहिलं आहे. नताशा हिच्या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे.
एवढंच नाही तर, नताशा हिने इन्स्टाग्रामवर एका व्हिडीओ देखील पोस्ट केला होता. व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली, ‘जेव्हा तुम्ही जगाचा निरोप घेता, तेव्हा सोबत फक्त नाती घेवून जाता. त्यामुळे नाती जोडताना विचार करा..’ नताशा हिच्या पोस्टची कायम चर्चा रंगलेली असते.
हार्दिक – नताशा यांनी जानेवारी 2020 मध्ये दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर मे 2020 नताशा – हार्दिक यांनी कोर्ट मॅरिज केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर नताशा हिने मुलाला जन्म दिला. नताशा – हार्दिक यांच्या मुलाचं नाव अगस्त्य असं आहे.
नताशा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत नताशा चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. हार्दिक याच्यासोबत लग्न करण्याआधी नताशा अभिनय क्षेत्रात सक्रिय होती.